हॅलो.....पत्र्याचे गॅरेज कोसळून ३ महिला जखमी

By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:46+5:302014-09-11T22:30:46+5:30

हॅलो

Hello ..... 3 women injured in collapsing garage | हॅलो.....पत्र्याचे गॅरेज कोसळून ३ महिला जखमी

हॅलो.....पत्र्याचे गॅरेज कोसळून ३ महिला जखमी

लो

गिरगाव येथे पत्र्याचे गॅरेज कोसळून ३ महिला जखमी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे बुधवारी रात्री गिरगाव येथे गॅरेज कोसळून तीन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गिरगावातील देशमुख लेन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हे गॅरेज बंद आहे. मोडकळीस आलेले हे गॅरेज पालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणीही राहत नव्हते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला राहणार्‍या काही लोकांनी या गॅरेजमध्ये वास्तव्य केले होते. पावसाचे दिवस असल्याने गॅरेजच्या छपराखाली काही लोक झोपत होते. काल रात्री अचानक वारा आल्याने गॅरेज कोसळला. यामध्ये कस्तुरी गोदरीया (४५), शोभा गोदरीया (५१) आणि मधू गोदरीया (३६) या तीन महिला जखमी झाल्या. परिसरातील लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत या महिलांना सैफी रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये या महिलांना मुका मार लागला असून एका महिलेचा हात फॅˆर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Hello ..... 3 women injured in collapsing garage