हॅलो ३ महामानवाचे विचार सर्व समाजापुढे पोहोचवा

By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30

फ्रान्सिस डिसोझा : म्हापसा पालिका सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Hello 3 Send the views of the superfine to all the communities | हॅलो ३ महामानवाचे विचार सर्व समाजापुढे पोहोचवा

हॅलो ३ महामानवाचे विचार सर्व समाजापुढे पोहोचवा

रान्सिस डिसोझा : म्हापसा पालिका सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बार्देस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे शिल्पकार होते. त्यांचा आदर्श आताच्या तरुण पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम हा शाळा, कॉलेजांमध्ये होणे आवश्यक आहे. डॉ. आंबेडकर हे सर्वधर्मियांचे कैवारी होते. त्यासाठी त्यांचे कार्यक्रम सर्वांनी एकत्र येऊन करणे आवश्यक आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार सर्व समाजापुढे नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.
म्हापसा पालिका सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि म्हापसा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री ॲड. डिसोझा बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्षा रूपा भक्ता, बार्देस तालुका मामलेदार क्षमा आरोंदेकर, नगरसेवक संदीप फळारी, दीपक म्हाडेश्री, आरपीआयचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखंडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
नगरसेवक फळारी म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे दलितांचे कैवारी होते. देशाचे आधुनिक नेते होते. त्यांनी भारत देशाची घटना लिहिली. त्यात त्यांनी सर्वसमावेशक अशी माहिती दिली. त्या घटनेनुसार आज देशाचा कारभार चालतो आहे. त्यांच्यामुळेच देशातील महिला पंतप्रधान ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकल्या.
ज्ञानेश्वर वारखंडकर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांच्यावर बोलण्यासारखे खूप काही आहे. त्यांनी हलाखीचे जीवन जगत असताना एका विजेच्या खांबाच्या प्रकाशाखाली अभ्यास करून पदवी प्राप्त केली. भाकरीच्या एका तुकड्यावर जीवन कंठित राहिले. त्यांच्याप्रमाणे महात्मा फुले यांनीही जीवन कंठिले. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे आज प्रत्येकाने वाचन करणे आवश्यक आहे. आंबेडकर यांनी भारताच्या घटनेबरोबरच चांगले विचार ठेवले. महात्मा ज्योतिबा फुले, संत कवी, व गौतम बुद्ध हे डॉ. आंबेडकर यांचे तीन गुरू होते. त्यांच्या मार्गदर्शनानेच आंबेडकर घडले.
भगवान साळकर यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर जयंती ही वटवृक्ष आहे. ही जयंती सर्व जातीधर्मियांची आहे. ती एकत्र येऊन साजरी करणे आवश्यक आहे. आज प्रत्येकाला शिक्षणाची गरज आहे. ती पूर्ण केल्यास खर्‍या अर्थाने डॉ. बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण होईल.
या वेळी सतीश कोरगावकर, मामलेदार क्षमा आरोंदेकर यांचीही समयोचित भाषणे झाली. स्वागतपर भाषण नगराध्यक्षा रूपा भक्ता यांनी केले. सूत्रसंचालन संध्या साळकर यांनी केले. अनिल हैवाळे यांनी आभार मानले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते म्हापसा पालिकेसमोरील उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (प्रतिनिधी)
फोटो : म्हापसा नगरपालिका उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उपस्थित उपमुख्यमंत्री ॲड. फ्रान्सिस डिसोझा. सोबत इतर.
(प्रकाश धुमाळ) १४०४-एमएपी-०६, ०७

Web Title: Hello 3 Send the views of the superfine to all the communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.