हॅलो 3 : फोटोग्राफिया संकेतस्थळाचे प्रकाशन

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:36+5:302015-08-19T22:27:36+5:30

- प्रथम येजाहली छायाचित्र स्पर्धेत प्रथम

Hello 3: The publication of the website of Photography | हॅलो 3 : फोटोग्राफिया संकेतस्थळाचे प्रकाशन

हॅलो 3 : फोटोग्राफिया संकेतस्थळाचे प्रकाशन

-
्रथम येजाहली छायाचित्र स्पर्धेत प्रथम
पणजी : ज्याप्रकारे जवान सीमेवर सक्रिय असतात, त्याप्रमाणे छायाचित्रकाराचे काम असते. छायाचित्रकार 24 तास सक्रिय असतो. कोणतीही घटना घडते, त्या ठिकाणी सर्वांत अगोदर छायाचित्रकार पोहोचतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार सोयरु कोमरपंत यांनी केले.
कला अकादमीच्या कृष्ण कक्षात बुधवारी आयोजित फोटोग्राफिया संकेतस्थळाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध छायाचित्रकार शिरीष कराळे, फॅशन फोटोग्राफर प्रसाद पानकर, वेब डिझाइन व अँप्लिकेशनचे संचालक वॅनर्न फर्नांडिस तसेच छायाचित्रकार नवदीप आगीयार उपस्थित होते. यावेळी कराळे म्हणाले की, गोव्यात छायाचित्रे काढण्यास प्रारंभ केला आणि आज मी जो काही आहे ते मला गोव्याने दिले आहे. गोव्यातील वातावरण छायाचित्रांसाठी उत्तम आहे. आज छायाचित्रकारांकडे विकसित तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत आणि याचा त्यांनी पुरेपूर वापर करुन घेणे आवश्यक आहे. एखाद्या लहान मुलाला छायाचित्र घेण्याचा अँगल जरी शिकवला तर तो मुलगा उत्तम फोटोग्राफर होऊ शकतो.
बॉक्स
- छायाचित्र स्पर्धेचे बक्षीस वितरण
यावेळी स्पार्क 2015 या छायाचित्र स्पर्धेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पार्क 2015 स्पर्धेचे प्रथम बक्षीस प्रथम येजाहली याला प्राप्त झाले. द्वितीय बक्षीस साईश पै रायकर तर तृतीय बक्षीस तेजेश कोरगावकर यांना प्राप्त झाले. प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस शिवानी कुंडे तर व्दितीय उत्तेजनार्थ बक्षीस मोहिद्दीन हुलगड यांना प्राप्त झाले.

Web Title: Hello 3: The publication of the website of Photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.