हॅलो ३ : काणकोणात अधिकार्यांअभावी जनतेची गैरसोय - मामलेदार व गटविकास अधिकारी पदे रिक्त
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:46+5:302015-06-15T21:29:46+5:30
काणकोण : गेल्या दोन महिन्यांपासून काणकोणचे मामलेदार रविशेखर निप्पाणीकर आजारी असल्याने रजेवर आहेत. गटविकास अधिकारी उदय प्रभुदेसाई यांची बदली झाली आहे, तर काणकोणच्या गटविकास अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले वैजावाडा-काणकोण येथील मिलिंद वेळीप हेसुद्धा प्रशिक्षणाला गेले असल्याने सध्या काणकोणात ही दोन्ही पदे रिक्त असल्याने विद्यार्थी, पालक खासकरून जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

हॅलो ३ : काणकोणात अधिकार्यांअभावी जनतेची गैरसोय - मामलेदार व गटविकास अधिकारी पदे रिक्त
क णकोण : गेल्या दोन महिन्यांपासून काणकोणचे मामलेदार रविशेखर निप्पाणीकर आजारी असल्याने रजेवर आहेत. गटविकास अधिकारी उदय प्रभुदेसाई यांची बदली झाली आहे, तर काणकोणच्या गटविकास अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले वैजावाडा-काणकोण येथील मिलिंद वेळीप हेसुद्धा प्रशिक्षणाला गेले असल्याने सध्या काणकोणात ही दोन्ही पदे रिक्त असल्याने विद्यार्थी, पालक खासकरून जनतेची मोठी गैरसोय होत आहे.विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, निवासी व अन्य दाखल्यांची गरज असते. मात्र, दोन्ही प्रमुख अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे काणकोणात जनतेची गैरसोय होत आहे. शिवाय गटविकास अधिकार्यांअभावी काणकोण तालुक्यातील विकासकामेही ठप्प झाली आहेत. काणकोण मामलेदारपदाचा ताबा सध्या मुरगाव तालुक्याचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल यांच्याकडे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)