हॅलो- २/३, आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा : फ ोंडू सावंत
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:36+5:302015-02-14T23:51:36+5:30
साखळी : माणसाचे जीवन धकाधकीचे बनले आहे. त्यांना आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. व्यायामाच्या अभावामुळे आरोग्यही बिघडत चालले आहे. आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा असून खेळामुळे शरिराला पुरेसा व्यायाम मिळत असतो, असे उद्गार कुडणे जिल्हा पंचायत सदस्य फ ोंडू सावंत यांनी व्यक्त केले.

हॅलो- २/३, आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा : फ ोंडू सावंत
स खळी : माणसाचे जीवन धकाधकीचे बनले आहे. त्यांना आपल्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. व्यायामाच्या अभावामुळे आरोग्यही बिघडत चालले आहे. आरोग्य संतुलनासाठी व्यायाम गरजेचा असून खेळामुळे शरिराला पुरेसा व्यायाम मिळत असतो, असे उद्गार कुडणे जिल्हा पंचायत सदस्य फ ोंडू सावंत यांनी व्यक्त केले. न्हावेली-साखळी येथे स्व. गुरुदास गावस स्मृतिप्रीत्यर्थ सहाव्या अ.गो. आंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पाहुणे म्हणून प्रताप गावस, प्राचार्य रमेश सिनारी, नारायण पाटील, पत्रकार चंद्रशेखर देसाई, सुरेश बायकेर, ओंकार गुरुदास गावस आणि दयानंद भगत आदींची उपस्थिती होती.माजी आमदार प्रताप गावस या वेळी बोलताना म्हणाले की, गुरुदास गावस यांनी न्हावेली येथे उच्च माध्यमिक विद्यालय आणि भव्य मैदान उपलब्ध करून गावाची शान वाढवली आहे. आज न्हावेली व पंचक्रोशीतील विद्यार्थी या विद्यालयाचा व मैदानाचा लाभ घेत आहेत. विविध परिवाराचे भाग्यविधाते या पाळी मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय गुरुदास गावस यांनी विविधा परिवाराचा वटवृक्ष उभा केला. त्यांच्या या कार्याचे स्मरण येत आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देणार्या सर्व विद्यालयांचे या वेळी प्रताप गावस यांनी अभिनंदन केले. विविधा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश सिनारी यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या स्पर्धांसंबंधी माहिती दिली. दयानंद भगत यांनी आभार मानले. जिल्हा पंचायत सदस्य फोंडू सावंत यांच्या हस्ते नारळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. फोटो - मेलवर : न्हावेली-साखळी येथे स्व. गुरुदास गावस मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा पंचायत सदस्य फोंडू सावंत. सोबत माजी आमदार प्रताप गावस, प्राचार्य रमेश सिनारी, सुभाष गावस व इतर. (छाया: संतोष मळीक)