हॅलो २ - कीर्तन संस्कृती संवर्धन गरजेचे
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:45+5:302015-05-05T01:21:45+5:30
साखळी : कीर्तनसारख्या संस्कृती संवर्धन उपक्रमांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हा एक आशेचा किरण असून सरकारतर्फे अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाते, असे कला व संस्कृ ती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी विठ्ठलापूर-साखळी येथे सांगितले.

हॅलो २ - कीर्तन संस्कृती संवर्धन गरजेचे
स खळी : कीर्तनसारख्या संस्कृती संवर्धन उपक्रमांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हा एक आशेचा किरण असून सरकारतर्फे अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाते, असे कला व संस्कृ ती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी विठ्ठलापूर-साखळी येथे सांगितले. विठ्ठलापूर, साखळी येथील श्री विठ्ठल मंदिरात बिल्वदल संस्थेतर्फे आयोजित कला व संस्कृती संचालनालय पुरस्कृत राज्यस्तरीय कीर्तन संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मांद्रेकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपसभापती अनंत शेट, खास निमंत्रित म्हणून साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, देवस्थानचे सचिव रावसाहेब राणे, बिल्वदलचे अध्यक्ष सागर जावडेकर, सचिव करुणा बाक्रे उपस्थित होत्या.मंत्री मांद्रेकर म्हणाले, पूर्वी तिन्ही नारदमुनी कीर्तनाच्या माध्यमातून संदेश पोहचविण्याचे कार्य करीत असत. त्या काळी ते कार्य महान होते. आज संदेशाची अनेक उपकरणे असली तरी कीर्तनाचे समाजप्रबोधन करण्याचे माध्यम महत्त्वाचे ठरले आहे. गोव्याची संगीत परंपरा थोर असून अनेक कलाकारांनी गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे.उपसभापती अनंत शेट म्हणाले, कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार घडत असतात. कीर्तन भक्तीच्या माध्यमातून ईश्वराकडे एकरूप होण्याची गरज आहे. कीर्तनाद्वारे समाजातील वेगवेगळ्या समस्या मांडून जनजागृती करू शकतो, त्याचप्रमाणे कीर्तनाद्वारे सुसंस्कृत समाजाची निर्मिती होऊ शकते. आमदार डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, कीर्तन व भजन क्षेत्रातील कलाकारांनी संस्कृतीचे जतन केले असून त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी व्यसनमुक्तीचा प्रसार होऊ शकतो व त्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार थांबू शकतात. समई प्रज्वलित करून या संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक सागर जावडेकर यांनी केले.या वेळी बिल्वदल संस्थेतर्फे मान्यवरांचा भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या संमेलनातून संत तुकाराम यांची जिवंत मूर्ती साकारणारे विजय देसाई हे खास आक र्षण ठरले होते. करुणा बाद्रे यांनी आभार मानले. फोटो: मेल वर,१) साखळी येथे कीर्तन संमेलनाचे उद्घाटन करताना कला व संस्कृती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर. बाजूस उपसभापती अनंत शेट, सागर जावडेकर, आमदार डॉ. प्रमोद सावंत व करुणा बाक्रे (संतोष मळीक)२) कीर्तन संमेलनात संत तुकारामाची जिवंत मूर्ती साकारणारे विजय देसाई. (संतोष मळीक)