हॅलो 2- छायाचित्राला बातमीपेक्षा जास्त महत्त्व : पार्सेकर

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:38+5:302015-08-19T22:27:38+5:30

पणजी : पत्रकार सविस्तरपणे बातमीची मांडणी करतो. तर छायापत्रकाराने काढलेल्या एका प्रभावी छायाचित्रात दहा हजार शब्द न बोलता मांडलेले असतात. पत्रकारितेत पत्रकाराला व छायापत्रकाराला समान महत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

Hello 2- More importance than photograph to news: Parsekar | हॅलो 2- छायाचित्राला बातमीपेक्षा जास्त महत्त्व : पार्सेकर

हॅलो 2- छायाचित्राला बातमीपेक्षा जास्त महत्त्व : पार्सेकर

जी : पत्रकार सविस्तरपणे बातमीची मांडणी करतो. तर छायापत्रकाराने काढलेल्या एका प्रभावी छायाचित्रात दहा हजार शब्द न बोलता मांडलेले असतात. पत्रकारितेत पत्रकाराला व छायापत्रकाराला समान महत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त बुधवारी (दि. 19) पाटो येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम गोवा छायापत्रकार संघटना, माहिती व प्रसिध्दी खाते, कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर आमदार सिध्दार्थ कुंकळयेकर, माहिती व प्रसिध्दी खात्याचे संचालक अरविंद बुगडे, संघटनेचे अध्यक्ष सोयरू कोमरपंत व सरचिटणीस आतिष नाईक उपस्थित होते.
या वेळी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या छायाचित्रीकरण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा खुला विभाग आणि शालेय विभाग अशा दोन विभागांत घेण्यात आली होती. शालेय विभागात अनुक्रमे अदिती देसाई, ऋषिकेश च्यारी, यशा र्शीराम यांना बक्षिसे मिळाली. तर खुल्या विभागात अनुक्रमे वैभव भगत, यशवंत भंडाती, अखिल साळगावकर यांना बक्षिसे मिळाली. उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून स्व. जॉयल डिसोझा यांचा मरणोत्तर सत्कार करण्यात आला. हा सन्मान त्यांचा सुपुत्र क्लायन डिसोझा यांनी स्वीकारला.
पत्रकारांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकारने कायदा निर्माण करण्याची गरज असल्याचे कोमरपंत यांनी मागणी केली. दरम्यान, कार्यक्रमात छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. डॉ. अब्दुल कलाम यांची छायाचित्रे प्रदर्शनात मांडून त्यांना र्शध्दांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
फोटो : कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. सोबत इतर.

Web Title: Hello 2- More importance than photograph to news: Parsekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.