हॅलो २- झाडाचे ओंडके पदपथावर ठेवल्याने पादचार्यांची गैरसोय
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:56+5:302015-06-02T00:03:56+5:30
वास्को : मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या पदपथावरच टाकल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्या पादचार्यांची गैरसोय होत आहे. तसेच पार्किं ग जागेतही फ ांद्या आणि ओंडके ठेवल्याने वाहने पार्क करण्यास अडथळा निर्माण होत आहे़

हॅलो २- झाडाचे ओंडके पदपथावर ठेवल्याने पादचार्यांची गैरसोय
व स्को : मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडांची छाटणी करून झाडाच्या फांद्या पदपथावरच टाकल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील ये-जा करणार्या पादचार्यांची गैरसोय होत आहे. तसेच पार्किं ग जागेतही फ ांद्या आणि ओंडके ठेवल्याने वाहने पार्क करण्यास अडथळा निर्माण होत आहे़ शहरातील स्वतंत्रपथ हा वाहतुकीचा मुख्य रस्ता आहे. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा अशोकाची जुनी झाडे आहेत़ ही झाडे जुनी झाल्याने ती मुळापासून वाकलेली आहेत़ त्यामुळे फ ांद्यांच्या वजनाचा भार झाडांवर पडू नये म्हणून मुरगाव नगरपालिकेने काही दिवसांमागे फ ांद्या कापून टाकल्या होत्या. मात्र, या कापलेल्या फ ांद्या पदपथावरच टाकण्यात आल्या आहेत़ काही दिवसांमागे येथील टुरिस्ट हॉस्टेलसमोरील एक मोठा वृक्षही उन्मळून पडला होता़ त्या वेळी येथील अग्निशामक केंद्राच्या जवानांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी या झाडाच्या बुध्याचे यंत्राने तुकडे केले होते़ हे तुकडेही पदपथावरच बरेच दिवस पडून आहेत़ तसेच रस्त्याच्या दुतफ र असलेल्या पदपथावरून येणार्या जाणार्या पादचार्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे़ त्यामुळे संबंधितांनी फ ांद्या व ओंडके पदपथावरून दूर करावेत, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. चौकट : मुरगावच्या नगराध्यक्षा लविना डिसोझाया झाडांचे ओंडके मोठे असल्याने ते कामगारांकडून दूर करता येत नाहीत़ एकतर ते जेसीबीच्या साहाय्याने उचलले पाहिजेत किंवा लाकूडतोड्याकडून ते फ ोडून घेतले पाहिजेत; पण फ ोडण्यासाठी मजूर मिळत नसल्याने काम रखडून पडले आहे. (प्रतिनिधी)फ ोटो आहे : ०१०६ वीएएस ०३ ओळी : स्वतंत्रपथ रस्त्यावरील अशोका झाडाची छाटणी करून पदपथावर ठेवण्यात आलेले लाकडाचे ओंडके. छाया : अनिल चोडणकर