हॅलो २-
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
शांतादुर्गा विद्यालयाच्या प्र्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

हॅलो २-
श ंतादुर्गा विद्यालयाच्या प्र्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरवडिचोली : विद्यावर्धक मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या वेळी संस्थेचे चेअरमन विजय सरदेसाई, राजेश पाटणेकर, रितेश मयेकर, सदाशिव वालावलकर, गुरुदास झांट्ये, श्रीकृष्ण धोंड, प्राचार्य सुदेश नाईक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण नाईक, नारायण बेतकीकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. विजय सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांचे यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, विद्यालयातील विज्ञान शाखेचा ९८ टक्के, वाणिज्य शाखा ९५ टक्के, कला शाखा ८१ टक्के, व्यावसायिक शाखा ९३ टक्के असा निकाल लागला. तसेच विशेष श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालेल्या ५३ विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.सुरेश नाईक यांनी स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढवा घेतला. सूत्रसंचालन पौर्णिमा रेडकर यांनी केले. तृप्ती बर्वे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)