हॅलो 1- म्हादई प्रकरण

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:52+5:302015-08-26T23:32:52+5:30

कर्नाटकाच्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडा : रमेश गावस

Hello 1- Mhadai Case | हॅलो 1- म्हादई प्रकरण

हॅलो 1- म्हादई प्रकरण

्नाटकाच्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडा : रमेश गावस

डिचोली : म्हादईप्रश्नी कर्नाटकाने अगदी पहिल्या दिवसापासून अनेक बेकायदा कृती करताना सर्व नियमांचे उल्लंघन करत कळसा कालव्याचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. आज त्यांनी मूळ मुद्दा बाजूलाच ठेवताना आंदोलने करून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारसमोर गोव्याने आपली बाजू सर्वप्रकारे अभ्यासपूर्ण मांडायला हवी. त्याचबरोबरच कर्नाटकाच्या सर्व प्रकारांचाही केंद्रासमोर पर्दाफाश करण्याची गरज आहे. केंद्राला कर्नाटकाच्या बेकायदा गोष्टी पटवून द्यायला हव्यात, अशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश गावस यांनी व्यक्त केली आहे.
पर्यावरण मंत्रालय, वन आणि पर्यावरण मंत्रालय, जलसंसाधन खाते, पश्चिम घाट अभ्यासक माधव गाडगीळ यांच्यासह सर्व तज्ज्ञ मंडळींसोबत गोव्याने आपली भूमिका केंद्रासमोर मांडायला हवी. याबाबत सखोल अभ्यास करून म्हादईचे महत्त्व केंद्राला पटवून देणे गरजेचे आहे.
गोव्यावर उद्भवणारे दूरगामी धोके हेरून त्याची मांडणी करायला हवी. त्याचबरोबर सर्व नियम पायदळी तुडवून कर्नाटकाने केलेल्या बेकायदा गोष्टी केंद्रासमोर मांडणे गरजेचे आहे, असे मत गावस यांनी व्यक्त केले आहे. गोव्याने अभ्यासपूर्ण तपासणी करताना भविष्यातील धोके व इतर बाबतीत सर्व गोष्टी मांडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने त्यांनी तयारी करायला हवी व केंद्रासमोर गोव्याची बाजू मांडण्याबरोबरच कर्नाटकाच्या सर्व बाजूंचा अभ्यास व त्यांनी आजपर्यंत केलेले गैरकृत्य केंद्रासमोर मांडण्याची गरज असल्याचे गावस म्हणाले.
सध्या जी कृती कर्नाटकाने अवलंबिली आहे ती अयोग्य आहे. पाण्याचा प्रश्न वेगळ्य़ा तर्‍हेने सोडवणे शक्य आहे. मुळात कर्नाटकाला जे पाणी हवे आहे, ते खरेच गरीब शेतकर्‍यांना की र्शीमंतांसाठी याचाही विचार व्हायला हवा, असे गावस यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hello 1- Mhadai Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.