हॅलो 1- विधानसभेतून
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:12+5:302015-08-14T22:54:12+5:30
पांढरा हत्ती

हॅलो 1- विधानसभेतून
प ंढरा हत्तीसरकार क्रीडा सुविधांच्या नावाखाली फक्त मोनुमेन्टन तयार करत आहे, अशी टीका डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. गोव्यात सरकारने फुटबॉल अकादमी उभी करावी, अशी आमदार सावळ यांची मागणी होती. त्यावर क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी सकारात्मक उत्तर दिले; पण ‘अनेकदा सावळ हेच आमच्या क्रीडा सुविधांना पांढरा हत्ती म्हणतात,’ असे तवडकर म्हणाले. मग तवडकर यांनी बांबोळी येथे उभारलेल्या स्टेडियमचे उदाहरण दिले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या वेळी हळूहळू प्रॉम्पटिंग करत आणखी काही प्रकल्पांची उदाहरणे तवडकर यांना सुचविली.अहो, बांबोळी व अन्यत्र उभारलेल्या मोठय़ा स्टेडियमचा वापर गोव्यातील खेळाडूंना होतो तरी काय, अशी विचारणा सावळ यांनी केली. या वेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे उभे राहिले. होय, मोठे स्टेडियम प्रकल्प हे पांढरे हत्तीच झाले आहेत. त्यांच्या देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. तुम्ही हा पैसा गोव्यातील खेळाडूंवर खर्च करा, असे खंवटे म्हणाले.या वेळी विरोधकांना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उत्तर दिले. तत्पूर्वी सावळ यांनी सरकार जे स्टेडियम उभे करतेय ते लोकांचे पैसे आहेत, असा शेरा मारला होता. तेच सूत्र पकडून मुख्यमंत्र्यांनी हे पैसे आमच्या खिशातील आहेत, असे आम्ही म्हणत नसल्याचे नमूद केले. आम्ही जी पाच ग्रामीण मैदाने विकसित केली त्यांचा लाभ स्थानिक खेळाडूंना होत नाही काय, असा प्रतिप्रश्न पार्सेकर यांनी अपक्ष आमदारांसमोर ठेवला. आमच्या सरकारने लोकांचा पैसा न्याय्य पद्धतीने वापरला. यापूर्वी ज्यांनी योग्य पद्धतीने लोकांचा पैसा वापरला नाही, ते आता भोगत आहेत, असे पार्सेकर म्हणाले. त्यांनी कुणाच्या नावाचा उल्लेख केला नाही; पण लुईस बर्जर प्रकरण व कामत-चर्चिलचा संदर्भ देत आहेत हे कळत होते. सत्ताधारी भाजप आमदारांना हसू फुटले. विधानसभा अधिवेशन सुरू असताना ते बाहेर आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सायंकाळी अनुदानित मागण्यांवरील चर्चेस उत्तर देतानाही सावळ यांना टोमणा मारला. आयटी उद्योग गोव्यात आणण्याच्या गोष्टी आम्ही गेली पंधरा वर्षे ऐकत आहोत, असे सावळ म्हणाले होते. पंधरा वर्षे नरेश विधानसभेत नव्हता; पण तो डिचोलीत टीव्हीसमोर बसून गोष्टी ऐकत होता, असे पार्सेकर म्हणाले. मंत्र्यांना उगाच बदनाम करू नका, सुके आरोप करू नका, असा सल्ला पार्सेकर यांनी सर्वच सदस्यांना निरोपाच्या संदेशावेळी दिला. निरोपाचा संदेश आम्ही अशासाठी म्हणतो; कारण शुक्रवारी अधिवेशनातील कामकाजाचा समारोप झाला. त्या वेळी पार्सेकर खूप प्रभावीपणे व समतोल बोलले हे नमूद करावे लागेल.आम्हाला अधिवेशनात बोलायला जास्त वेळ मिळायला हवा, असे मतप्रदर्शन करण्याची संधी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सोडली नाही. काब्राल हे यावेळच्या पूर्ण अधिवेशनात खूप मनापासून आणि पोटतिडकीने बोलले आहेत. अनेक गंभीर मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. सरकारी कर्मचार्यांना आम्ही लवकर घरी जाऊ नका, असे सांगत असतो. मग विधानसभेत आम्ही आमदारांनी सायंकाळी सहा वाजता काम संपविण्याची घाई का करावी, अशी विचारणा काब्राल यांनी केली. या वेळी पार्सेकर त्यांच्याकडे पाहून हसू लागले. ‘माझी रात्री बारा वाजेपर्यंत इथे सभागृहात थांबण्याची तयारी आहे. आमदारांना पाच मिनिटांत किंवा तीन मिनिटांत बोलून विषय संपविण्याचे बंधन लागू केले जाऊ नये,’ अशी अपेक्षा काब्राल यांनी व्यक्त केली.