हॅलो १ : 108

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:08+5:302015-07-08T23:45:08+5:30

जीव गेल्यावर येते रुग्णवाहिका

Hello 1: 108 | हॅलो १ : 108

हॅलो १ : 108

व गेल्यावर येते रुग्णवाहिका
कुडचडेवासियांची व्यथा
कुडचडे : येथील सरकारी आरोग्य केंद्रामध्ये तीन रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत आहे़ त्यामुळे अनेकदा या रुग्णवाहिकेस अपघातस्थळी पोहचण्यास विलंब होत असल्याने जखमींना जीव गमवावा लागत आहे़ प्रशासनाने इतर दोन्हीही रुण्वाहिका कार्यरत करून आरोग्य सेवा गतिमान करण्याची मागणी होत आहे़
सन २0१५ च्या चालू वर्षीत जून अखेरपर्यंत कुडचडे भागात पाचजणांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच या विभागामध्ये येणार्‍या रुग्णांच्या तुलनेमध्ये डॉक्टरांची संख्यादेखील कमी आहे. त्यांना चांगल्याप्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़
परिसरातील ज्येष्ठ नागरिक राजन नाईक म्हणाले, १0८ रुग्णवाहिका अपघातस्थळी नेहमीच उशिराने येते. त्यामुळे त्या अपघातग्रस्तांना जीव गमवावा लागतो. या अशा रुग्णवाहिकेची गरज काय आहे. ही रुग्णवाहिका जलदगतीने येणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hello 1: 108

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.