शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

Akhilesh Yadav: 'इंधन भरण्यासाठी हेलिकॉप्टर थांबवले', अखिलेश यांच्या आरोपावर सरकारचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:36 IST

अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर त्यांचे हेलिकॉप्टर थांबवल्याचा आरोप केला होता.

नवी दिल्ली: समाजवादी पार्टीचे सुप्रिमो अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर थांबवल्याच्या प्रकरणाने जोर धरला आहे. पण, आता याच प्रकरणाबाबत सरकारी सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यांचे हेलिकॉप्टर जाणूनबुजून नाही, तर इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले होते. इंधन भरल्यानंतर त्यांना तातडीने उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. 

अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर त्यांचे हेलिकॉप्टर मुद्दामून रोखून धरल्याचा आरोप केला होता. अखिलेश यांच्या वेळापत्रकानुसार दुपारी एकच्या सुमारास त्यांची मुझफ्फरनगरमध्ये पत्रकार परिषद होती, मात्र ते दुपारी अडीच वाजेपर्यंत दिल्लीतच होते. पण, काही वेळाननंतर त्यांनी मुझफ्फरनगरकडे उड्डाण घेतले.

अखिलेश यांचे ट्विट'माझे हेलिकॉप्टर कोणतेही कारण न देता दिल्लीमध्ये रोखून धरण्यात आले आहे. मला मुजफ्फरनगरला जाऊ दिले जात नाहीय. भाजपचा एक वरिष्ठ नेता आताच इथून रवाना झाला आहे. हरत असलेल्या भाजपाची निराशेने भरलेला कट आहे. जनता सर्व पाहतेय", असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. 

अखिलेश यांचे दुसरे ट्विटअखिलेश यादव यांना विमान प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले होते. जवळपास 40 मिनिटांनी केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अखिलेश म्हणाले, आता हेलिकॉप्टरद्वारे उड्डाण घेत असल्याचे म्हटले. सत्तेचा दुरुपयोग हा हरणाऱ्या लोकांचे चिन्ह आहे, समाजवादी संघर्षाच्या इतिहासात हा दिवस नोंद होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा