Helicopter Crash in Uttarkashi:उत्तराखंडमधील गंगोत्रीच्या दिशेने जाणारे एक खासगी प्रवासी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या उत्तरखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ही घटना घडली. गंगोत्रीकडे जात असताना हेलिकॉप्टरचा सकाळी ९ वाजता अपघात झाला. यात ५ भाविक जागीच मरण पावले, तर दोन जण जखमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाविकांना घेऊन हेलिकॉप्टरने डेहरादूनवरून उड्डाण केले होते. हर्सील हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर उतरणार होते.
वाचा >>भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
सात प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टरने गंगोत्रीच्या दिशेने उड्डाण केले. उत्तरकाशी जिल्ह्यात असतानाच सकाळी ९ वाजता हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आणि ते डोंगराळ भागात कोसळले. यात पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
नागरिक, पोलीस आणि जवानांनी सुरू केली बचाव मोहीम
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. पोलिसांना कळताच पथकही घटनास्थळी आले. लष्कराचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापनच्या जनावांनाही बोलवण्यात आले. रुग्णावाहिका घटनास्थळी बोलवण्यात आल्या.
गरवलचे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. हे हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगानानीमध्ये कोसळले आहे, असेही त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सध्या प्रशासन आणि बचाव पथके अपघातस्थळी असून, मदत कार्य वेगाने सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.