नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: August 8, 2016 17:28 IST2016-08-08T17:28:46+5:302016-08-08T17:28:46+5:30

नेपाळमध्ये खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.

The helicopter collapses in Nepal, killing seven people | नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

काठमांडू, दि. 8- नेपाळमध्ये खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. एका पाच दिवसांच्या आजारी बाळाला उपचारासाठी घेऊन हेलिकॉप्टर काठमांडूकडे निघाले होते. नुओकोट जिल्ह्यातील भतीने दंडा येथे आज दुपारी एकच्या सुमारास हेलिकॉप्टरला अपघात होऊन कोसळले. या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ नागरी विमान वाहतूक विभागानं दिली आहे. या हेलिकॉप्टरला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू असून, काठमांडूतल्या एका गावाजवळ मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याची माहिती तिथल्या गावक-यांनी दिली आहे. त्या दिशेनेच बचावकार्य सुरू असल्याचं नेपाळच्या नागरी विमान वाहतूक विभागानं सांगितलं आहे.

Web Title: The helicopter collapses in Nepal, killing seven people