नवी दिल्ली : उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीर आणि हिमाचल मध्ये बर्फवृष्टीमुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी या बर्फवृष्टीचा फायदा पर्यटकांनी उचलत आनंद लुटला. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांची नासाडी झाली आहे.रविवारी झालेल्या पावसामुळे सोमवारी सकाळपासूनच दिल्लीत थंडगार वारे वाहत होते. किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत हवेची गुणवत्ता सुधारली आहे.
उत्तरेत जोरदार बर्फवृष्टी, राजस्थानमध्ये गारपिटीमुळे पिके उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 05:58 IST