शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Bharat Bandh: राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पोलिसांचा चोख बंदोबस्त; अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 08:58 IST

गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. २ एप्रिलला देशातील दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला उत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या संघटनेकडून जाहीरपणे भारत बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा लक्षात घेता पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मध्य प्रदेशच्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. राजस्थानातील काही भागांमध्येही संचारबंदी लागू करुन निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील हापुड जिल्ह्यात अफवा पसरु नयेत म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने काही बदल सुचवले होते. या बदलांमुळे हा कायदाच कमकुवत होईल, असा आक्षेप अनेक दलित संघटनांनी नोंदवला होता. त्यामुळे दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदचा सर्वाधिक परिणाम मध्य प्रदेश आणि राजस्थानात पाहायला मिळाला होता. या बंदनंतर जातीवर आधारित आरक्षणाविरोधात १० एप्रिल रोजी भारत बंदची हाक देणारे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले जात होते. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदSocial Mediaसोशल मीडिया