शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 07:27 IST

मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे शेकडो पर्यटक अडकले आहेत.

दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील मिरिक आणि दार्जिलिंगच्या डोंगररांगांमध्ये रविवारी झालेल्या अविरत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने अनेक मुलांसह किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

मुसळधार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे शेकडो पर्यटक अडकले आहेत. भूस्खलनाचा  सर्वाधिक फटका बसलेल्या मिरिक भागात किमान ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सात जखमींना या भागातून वाचवण्यात आले आहे. दार्जिलिंगमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिस, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. 

मुख्यमंत्री फिल्डवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, हे २०१५ नंतरचे सर्वात भीषण संकट आहे. मी मुख्य सचिवांसह पाच बाधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठका घेतल्या. मी सकाळी ०६:०० वाजेपासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. फक्त १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला, ज्यामुळे किमान सात ठिकाणी गंभीर पूर, भूस्खलन झाले.

शेकडो पर्यटक अडकले दुर्गापूजेसाठी दार्जिलिंगच्या डोंगररांगांमध्ये आलेले शेकडो पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे दार्जिलिंगच्या टेकड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

चीनवर मॅटमो वादळाचा प्रभाव वाढतोयबँकॉक : चीनच्या दिशेने झेपावणाऱ्या मॅटमो वादळाचा प्रभाव वाढत आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी  चीन सरकारने ग्वांगडोंग व हैनान प्रांतातील ३ लाख ४७ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. सकाळी या वादळाचा वेग प्रतितास १५१ किमी होता.  या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.  त्यामुळे खबरदारी म्हणून चीन सरकारने पावले उचलली आहेत. 

भारत करणार मदत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर लिहिले की, नेपाळमधील जीवितहानी आणि नुकसानीमुळे आम्ही दुःखी आहोत. भारत नेपाळ सरकार आणि जनतेसोबत उभा आहे. गरज भासल्यास भारत सर्वतोपरी मदत करेल.वाहतूक बंद : नेपाळमध्ये आपत्कालीन सेवा, मालवाहतूक आणि काही प्रवासी वाहनेच चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे सर्व देशांतर्गत विमानसेवा तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्रिभुवन विमानतळाचे महाव्यवस्थापक हंसा राज पांडे यांनी दिली.

नेपाळमध्ये पुराचे ५१ बळी, १० जण बेपत्ताकाठमांडू : नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली असून, आता ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १० जण बेपत्ता आहेत. पूर्व नेपाळच्या इलाम जिल्ह्यात भूस्खलनामुळे सर्वाधिक ३७ मृत्यू झाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Landslide Kills 20 in Darjeeling After Heavy Rain

Web Summary : Heavy rains in Darjeeling caused landslides, killing at least 20. Hundreds of tourists are stranded. China evacuates thousands due to Matmo cyclone. Nepal floods claim 51 lives; India offers assistance.
टॅग्स :floodपूर