जळगावात तीन तालुक्यात अतिवृष्टी जोरदार पाऊस : एकाच दिवसात विक्रमी ५८६.९ मि.मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 20:00 IST2016-06-29T20:00:52+5:302016-06-29T20:00:52+5:30
जळगाव : मंगळवारी रात्री वरुणराजाने जिल्हावासीयांना अक्षरश: झोडपून काढले. चोपडा, धरणगाव व जळगाव या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून गेल्या २४ तासात जिल्ात विक्रमी अशा एकूण ५८६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आला. चोपडा तालुक्यातील काही गावांना जोरदार फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

जळगावात तीन तालुक्यात अतिवृष्टी जोरदार पाऊस : एकाच दिवसात विक्रमी ५८६.९ मि.मी. पावसाची नोंद
ज गाव : मंगळवारी रात्री वरुणराजाने जिल्हावासीयांना अक्षरश: झोडपून काढले. चोपडा, धरणगाव व जळगाव या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून गेल्या २४ तासात जिल्ात विक्रमी अशा एकूण ५८६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाल्यांना पूर आला. चोपडा तालुक्यातील काही गावांना जोरदार फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जळगावात पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही क्षणात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड ते दोन तास पाऊस सुरु होता. मंगळवारी चोपडा तालुक्यात सर्वाधिक १३२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ धरणगाव तालुक्यात ९९.८ मि.मी., जळगाव तालुक्यात ७२.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यात ६२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.रावेर व यावलमध्ये शिडकावातीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली असली तरी अन्य तालुक्यांमध्ये वरुणराजाने पाठ फिरवली. रावेर तालुक्यात ४.१, यावल तालुक्यात ९.२ मिमी, बोदवड तालुक्यात १० मि.मी. तर चाळीसगाव तालुक्यात १२ मिमी.पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहा पाऊस असा...मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे नद्या व नाले वाहून निघाले. एकाच दिवसात जिल्ात ५८६.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. भुसावळ २५.४,मुक्ताईनगर १२.३, अमळनेर ३७.३, पारोळा ३४.६, जामनेर २१.८, पाचोरा ३२.०, भडगाव २३.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.जिल्ात मंगळवार २८ जून पर्यंत सरासरी ७४१.२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी रात्री ५८६.९ मि.मी.पाऊस झाला. त्यामुळे जिल्ात आतापर्यंत १३२८.१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जिल्ात ६९.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात आतापर्यंत धरणगाव, चोपडा, एरंडोल, जळगाव व भुसावळ तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तर बोदवड, मुक्ताईनगर, यावल व रावेर या तालुक्यांमध्ये दमदार पावसाची अपेक्षा आहे.