शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पावसाचा कहर! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 16 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:33 IST

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे.

केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास 2537 प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात येत आहे. SDRF सोबतच लष्कराचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरहीही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे. 

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. कुटुंबीयांचा या लोकांसोबतचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायएमएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचा चमू देखील बचाव कर्यात आहे.

लिंचोली आणि भिमबली येथे अडकलेल्या लोकांना शेरसी येथे पोहोचवले जात आहे. काही यात्रेकरूंना गौरीकुंडावरून पगडंडी मार्गे सोनप्रयागला आणले जात आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग दरम्यानचा जवळपास 100 मीटर भाग उध्वस्त झाला आहे. डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे.

भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या 737 यात्रेकरुंना हेलीकाप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर 200 यात्रेकरूंना रास्त्याने आण्यात आले आहे. या अभियानात पाच हेलिकाप्टरचा समावेश आहे.

सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून 1700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही 1300 जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू  ऑपरेशन सुरू राहणार आहे.

एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये 1100 ते 1400 भाविक, लिंचौलीमध्ये 95 तसेच भीमबलीमध्ये जवळपास 150 यात्रेकरू अडकलेले आहेत. याशिवाय, कुमाऊंमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथPoliceपोलिस