फुलंब्री तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30
नाल्याच्या काठावर असलेली घरे पडली - खते, धान्य भिजली

फुलंब्री तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान
न ल्याच्या काठावर असलेली घरे पडली - खते, धान्य भिजलीफुलंब्री : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाकोद येथे अनेक घरे पडली. जीवनावश्यक सामान वाहून गेले.फुलंब्री तालुक्यावर वरूण राजाची कृपा झाल्याने ७ जूनपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंद असला तरी काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आळंद, खामगाव भागात रविवारी मुसळधार पाऊस पडल्याने खामगाव येथील तलाव तुडंूब भरला. सांडव्याद्वारे पाणी खाली नाल्याला आल्याने वाकोद येथील शेतकर्याची या नाल्याच्या काठावर बांधली होती ती घरे पडली. घरातील खते, बियाणे, भांडे, धान्य, चारा, वाहून गेली.शेतकरी एकनाथ महादू ताठे, रघुनाथ काळूबा ताठे, पंडीत बंडू ताठे, अशोक बाबूराव ताठे, सोमीनाथ पाटीलबा ताठे, जयवंता दादा कापडे, सुभाषदादा कापडे, हारुणाबाई बयाजी कापडे, सर्जेराव बाजीराव कापडे, कडूबा भाऊलाल कापडे, नागोराव ताठे, लक्ष्मण ताठे, दिनकर कापडे, शालिकराव घुगे यांची राहती घरे पडली. धान्य, खते, बिजली, भांडे वाहून गेली. नाल्याच्या दुसर्या बाजूला असलेल्या वस्तीवरील लोकांना गावात येता आले नाही.तलाव फुटल्याची अफवा- खामगाव येथील तलाव फुटल्याची अफवा पसरल्याने रविारी रात्रीला नाला काठावर राहणार्या व खामगाव येथील नागरिकात भितीचे वातावरण पसरले होते. रात्री प्रत्यक्षात तलावानजीक जाऊन खात्री केल्यानंतर नागरिक निवांत झोपले.तहसीलदार यांची भेटदरम्यान खामगाव येथील तलाव फुटल्याची अफवा पसरल्यानंतर तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी शिवाजी माने यांनी तलावावर जाऊन पाहणी केली. तलाव फुटणार नसल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.सोमवारी दुपारी चार वाजेच्यादरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. गिरजा, फुलमस्ता नदीला पाणी आले, तसेच तालुक्यातील गणोरी, जातेगाव, बाभूळगाव येथील तलावात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाणी आले आहे. सांजूळ, वाकोद, फुलंब्री प्रकल्पात अल्प साठा आला.चार वर्षाची आकडेवारी - फुलंब्री तालुक्यात गेल्या चार वर्षात कालांतराने पाऊस कमी पडत आहे; पण यंदा केवळ नऊ दिवसात तालुक्यात ७६९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. २०१२ साली पूर्ण वर्षभर सरासरी ३३३२०१३ साली वर्षभरात सरासरी ७५४२०१४ साली वर्षभरात सरासरी ४९८२०१५ चालू वर्षी केवळ नऊ दिवसात १९२ मि.मी. पाऊस पडला आहे.