शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:26 IST

हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. राज्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता. पंडोह येथे नदीचं पाणी घर व बाजारपेठेत शिरलं आहे. मंडी ते मनाली हा चंदिगड मनाली महामार्ग विविध ठिकाणी दरड कोसळल्याने बंद करण्यात आला आहे.  सोलनमध्ये कालका-शिमला ट्रॅकवर ट्रेनची वाहतूक थांबवण्यात आली आहे. हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत.

लाहौल-स्पितीच्या समदो काझा ग्रांफू रस्त्यावर पुरानंतर, ग्रांफू आणि छोटा दर्रा दरम्यान दोन ट्रेवलरमध्ये 30 महाविद्यालयीन विद्यार्थी अडकले होते, त्यांना रात्रभर चाललेल्या बचाव मोहिमेनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मंडी-पंडोह NH वर भूस्खलनामुळे रस्ता बंद झाला होता. कुल्लूच्या आखाडा बाजारात नदीच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिसरात पाणी साचलं आहे, तर काही ठिकाणी भूस्खलनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे.

रस्ते बंद, 3 जणांचा मृत्यू 

लाहौलच्या जुंडा नाला आणि तेलिंग नाल्याला पूर आल्याने मनाली-लेह रस्ता बंद करण्यात आला आहे. कुल्लू येथील राहनीनाला येथे दरड कोसळल्याने रोहतांग रस्ताही बंद करण्यात आला आहे. कालका-शिमला रेल्वे मार्गावरील ट्रेन बंद आहेत. शिमल्याच्या धिंगू मंदिराला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळली आहे. उना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे ट्रॅकच्या इलेक्ट्रिक लाईनवर झाड पडून आग लागली. चंबा येथील सरोथा नाल्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाने तातडीने दहा हजारांची मदत दिली आहे. श्रीखंड महादेव यात्रेदरम्यान एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण बेपत्ता आहेत. कुल्लूच्या लंका बेकरमध्ये घर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुरामध्ये अडकले लोक, रेड अलर्ट जारी 

मंडी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाने आता कहर केला आहे. चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणं मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यायी मार्गही पूर्णपणे बंद असल्याने लोक अडकून पडले आहेत. पंडोहचा अर्धा बाजार पाण्याखाली गेला आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. पुरामुळे 6 लोक त्यांच्या घरात अडकले होते, त्यांना स्थानिक पोलीस आणि SDRF च्या टीमने सुखरूप बाहेर काढले. हवामान खात्याने हिमाचलमध्ये 9 जुलैला रेड अलर्ट जारी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊसfloodपूर