शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतात ऊन-पावसाचा खेळ, ९ राज्यांत पावसाचा इशारा; तर राजस्थानात पारा चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 06:30 IST

दिल्ली-राजस्थानसह उत्तर भारतात काही राज्यांत उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानातील काही भागांत तापमान ३९ अंशांपर्यंत पोहचले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली-राजस्थानसह उत्तर भारतात काही राज्यांत उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानातील काही भागांत तापमान ३९ अंशांपर्यंत पोहचले आहे. तर बिहार व झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून, याचा परिणाम बंगाल, आसाम व मेघालयाच्या काही भागांत हलका पाऊस होत आहे. मंगळवारी हिमाचल-उत्तराखंड, काश्मीरच्या काही भागांत पावसाचा इशारा दिला आहे.

१४ मार्चपर्यंत पावसाची शक्यता 

१४ मार्चपर्यंत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, प. बंगाल आणि ओडिशा या राज्यांत ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. पंजाब-हरियाणात हवामान कोरडे असून, येत्या दोन-तीन दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

दक्षिणेत उकाडा वाढला

उत्तरेत तापमानात वाढ होताच दक्षिण भारतातही उष्णता व उकाडा वाढला असून, तामिळनाडूत याचे प्रमाण अधिक आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात उकाडा जाणवत असला तरी उन्हाचा कडाका नाही. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांत पारा वाढत असल्याचे जाणवते.  

हवामानाचा अंदाज...

राजस्थान व सौराष्ट्र-कच्छ भागात मंगळवारपर्यंत उष्णता प्रचंड जाणवेल. हिमाचल प्रदेशचा काही भाग ते महाराष्ट्राच्या विदर्भ व उत्तरेकडील भागांत बुधवार-गुरुवारपर्यंत उन्हामुळे उकाडा वाढेल. 

राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्राच्या काही भागांत तीन-चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

११ मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये हलका पाऊस तर काही भागात बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : North India sees sun and rain; heatwave in Rajasthan.

Web Summary : North India experiences fluctuating weather with rising temperatures in Rajasthan. Rain alert issued for nine states. Southern India faces increased humidity, while parts of northwest India brace for temperature rise.
टॅग्स :weatherहवामान अंदाजdelhiदिल्लीRajasthanराजस्थान