अहमदाबादमध्ये एक भयावह घटना घडली आहे. एका बहुमजली इमारतीत राहणे जेवढे प्रेस्टिजिअस आहे तेवढेच ते धोक्याचे देखील आहे. एका बहुमजली इमारतीला आग लागली होती. इमारतीत राहणाऱ्या लोकांनी जिवाच्या आकंताने आगीपासून वाचण्यासाठी खालच्या फ्लोअरवर उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच लहान मुलांनाही त्यांच्या पालकांनी जिवाच्या आतंकाने खाली टाकण्याचा प्रयत्न केला. हा भयानक व्हिडीओ समोर आला आहे.
चौथ्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याने अडकलेल्या लोकांनी हे धाडस केले. परंतू, हा व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला आहे. सुरतमध्येही शुक्रवारी सकाळी एका बहुमजली इमारतीला आग लागली होती. भीषण आगीमुळे काही लोक वरच्या मजल्यावर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या अडकलेल्या १८ जणांना वाचवले होते.
सध्या उष्णतेने उच्चांक गाठला आहे, यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे गरम होऊन पेटण्याची शक्यता जास्त असते. यातून घरात इंटेरिअर केले जाते, यात मोठ्या प्रमाणावर आगीच्या झटकन भक्ष्यस्थानी जाणारे साहित्य वापरले जाते. प्लायवूड, प्लास्टिक, वॉलपेपर असे अनेक प्रकार असतात. आग लागली की ती सर्वत्र काही वेळातच पसरते. यामुळे वरच्या फ्लोअरला राहत असलेल्या लोकांना धुराचा त्रास होतो. तसेच आगीच्या ज्वाळा वरच्या घरांनाही वेढतात. यामुळे मोठ्या उंचीच्या इमारतीमध्ये आग लागली की जिवघेणा धोका असतो. बचावासाठी देखील पर्याय खूप कमी असतात. शहरांमध्ये उंचच उंच इमारती बांधल्या जातात, परंतू तिथे फायर ऑडिट किंवा फायर सेफ्टी यंत्रणा देखील कार्यन्वित नसते किंवा त्याचा वापर कसा करावा याचेही ज्ञान या रहिवाशांना नसते. यामुळे हे लोक आग लागल्या लागल्या आगीवर नियंत्रण मिळवू शकत नाहीत.