गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. कपराडा येथील कुंभ घाटाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वजण आंबा जंगल परिसरातील एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आले आहे. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, आंबा जंगल परिसरात राहणारे एक कुटुंब कारने कपराडा येथून नानापोढाच्या दिशेने जात होते. कार कुंभ घाटाजवळ आली असता, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमधील ७ जणांनी जागीच प्राण सोडले, तर एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
परिसरात शोककळा, घटनास्थळी लोकांची गर्दी
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. कारचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या घटनेची माहिती मिळताच कपराडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी आणि पोलीस तपास
या भीषण अपघातानंतर कुंभ घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिला असून, अपघाताचा नेमका दोष कोणाचा होता, याचा तपास पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण आंबा जंगल परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : A devastating car-truck collision near Valsad's Kumbh Ghat claimed seven lives from one family. The accident occurred as the family was traveling from Kaprada. One person is critically injured. Police are investigating the cause; the area mourns.
Web Summary : वलसाड के कुंभ घाट के पास एक कार और ट्रक की टक्कर में एक ही परिवार के सात सदस्यों की जान चली गई। परिवार कपराडा से यात्रा कर रहा था। एक व्यक्ति गंभीर रूप से घायल है। पुलिस दुर्घटना के कारणों की जांच कर रही है, इलाके में शोक है।