शबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 04:10 IST2018-10-24T04:10:09+5:302018-10-24T04:10:24+5:30
महिलांना प्रवेश खुला करण्याच्या महिनाभरापूर्वी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या १३ नोव्हेंबर रोजी खुली सुनावणी करणार आहे.

शबरीमाला निकालावर होणार खुला फेरविचार, १३ नोव्हेंबर रोजी सुनावणी
नवी दिल्ली : शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या महिनाभरापूर्वी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या १३ नोव्हेंबर रोजी खुली सुनावणी करणार आहे.
नियमानुसार ज्यांनी मूळ निकाल दिला त्याच न्यायाधीशांनी फेरविचार याचिकांवर विचार करायचा असतो. शबरीमालाचा निकाल देणाऱ्या घटनापीठापैकी सरन्यायाधीश दीपक मिस्रा आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे फेरविचारासाठी त्यांच्याजागी नवा न्यायाधीश नेमावा लागेल.