धार्मिक अतिक्रमणावर आज सुनावणी

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:07+5:302015-08-11T23:16:07+5:30

नागपूर : शहरातील रोडवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या धार्मिकस्थळांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित जनहित याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

Hearing on religious encroach today | धार्मिक अतिक्रमणावर आज सुनावणी

धार्मिक अतिक्रमणावर आज सुनावणी

गपूर : शहरातील रोडवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या धार्मिकस्थळांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित जनहित याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.
मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. रोडवरील अनधिकृत धार्मिक बांधकामांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी अपघात होतात. न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही शहरातील रस्त्यांवर मंडप व स्वागतद्वारे उभारली जातात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी मिठा नीम दर्गापुढील डिव्हायडरवरचे धार्मिक अतिक्रमण हटविले होते. यानंतर काही लोकांनी संपूर्ण डिव्हायडर तोडून पुन्हा रोडच्या मध्यभागी पूजा मांडली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच, धार्मिकस्थळांच्या अतिक्रमणाचे सर्वेक्षण सुरू असून त्यानंतर किती धार्मिकस्थळे पाडायची, किती कायम ठेवायची व किती स्थानांतरित करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतर्फे न्यायालयाला देण्यात आली आहे.

Web Title: Hearing on religious encroach today