शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘क्लीन चिट’वर बुधवारी होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 05:45 IST

निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या सहा प्रकरणांत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय येत्या बुधवारी ८ मे रोजी विचार करणार आहे.

नवी दिल्ली -  निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या सहा प्रकरणांत पंतप्रधान मोदी यांना ‘क्लीन चिट’ देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर सर्वोच्च न्यायालय येत्या बुधवारी ८ मे रोजी विचार करणार आहे.मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर आयोग निर्णय घेत नसल्याची तक्रार काँग्रेस खासदार सुश्मिता देव यांनी केली. त्यावर सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने आयोगास ६ मेपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाने निर्णय घेऊन सर्व सहा प्रकरणांत मोदींना ‘क्लीन चिट’ दिली. याचिकेच्या सुनावणीत याचिका करणाऱ्यांचे ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सहापैकी पाच प्रकरणांचे निर्णय दोन विरुद्ध एक अशा बहुमताने झाले. आयोगाने या असहमतीच्या मताखेरीज निकालपत्रे दिली आहेत. ती आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध नाहीत.मार्गदर्शक तत्त्वे ठरवासिंघवी म्हणाले की, मोदींनीजी भाषा व शब्द वापरले तेच शब्द इतरांनी वापरले, तर आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदी लागू केली, पण मोदींना ‘क्लीन चिट’ दिली. याबाबत कोर्टाने काही मार्गदर्शक तत्वे ठरवून द्यावीत, ज्याचा भविष्यात उपयोग होईल. आयोगाच्या निर्णयाच्या प्रती रेकॉर्डवर सादर करण्यासाठी खंडपीठाने सिंघवी यांना वेळ दिला. पुढील सुनावणी बुधवारी होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत