दिलीपकुमार सानंदांवरील सुनावणी तहकूब

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:50+5:302015-02-13T23:10:50+5:30

नागपूर : खामगाव येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी तहकूब झाली. सानंदा यांना यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

The hearing on Dilipkumar Sanand | दिलीपकुमार सानंदांवरील सुनावणी तहकूब

दिलीपकुमार सानंदांवरील सुनावणी तहकूब

गपूर : खामगाव येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी तहकूब झाली. सानंदा यांना यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
२००६-०७ मध्ये खामगाव नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीसाठी आर्किटेक्टकडून नकाशे मागविले होते. नाशिक येथील काबरे ॲन्ड चौधरी कंपनीचे नकाशे स्वीकारण्यात आले. नामनिर्देशित सदस्य संदीप वर्मा यांनी या आर्किटेक्टचे दर तुलनेने जास्त असल्यामुळे नगर परिषदेचे ३९ लाख ४२ हजार १६९ रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करून हे प्रकरण लावून धरले. यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी सानंदा यांच्यासह एकूण ७ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सानंदा यांच्यातर्फे ॲड. राजेंद्र डागा कामकाज पाहात आहेत.

Web Title: The hearing on Dilipkumar Sanand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.