शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकला - उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 13:30 IST

भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

मुंबई  : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला सोमवारी केली. भाजपचे सदस्य महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवत दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. दंडाधिकाऱ्यांच्या या समन्सला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत त्यांच्यावरील संपूर्ण कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठापुढे सोमवारी होती. सोमवारच्या सुनावणीत श्रीश्रीमल यांचे वकील रोहन महाडिक यांनी या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागितली. त्यावर राहुल गांधी यांचे वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयाला सांगितले की, श्रीश्रीमल यांना उत्तर देण्यास मुदत देण्यास आमची काही हरकत नाही, मात्र तोपर्यंत दंडाधिकारी पुढील सुनावणी घेऊ शकत नाही.न्यायालयाने श्रीश्रीमल यांना राहुल गांधी यांच्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदत देत दंडाधिकारी यांना दाव्यावरील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी न ठेवता २० डिसेंबरनंतर पुढील सुनावणी घेण्याची सूचना केली. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे सदस्य महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. या दाव्याची दखल घेत दंडाधिकाऱ्यांनी २८ ऑगस्ट २०१९ मध्ये फौजदारी कारवाई करत राहुल गांधी यांना समन्स बजावले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालय