शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 16:19 IST

मृतदेह खड्ड्यात फेकणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पुद्दुचेरी: एकीकडे कोरोनाशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं देशभरात कौतुक सुरू असताना दुसरीकडे पुद्दुचेरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एका कोरोना बाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पुद्दुचेरीमध्ये एका ४२ वर्षीय व्यक्तीचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीनं मृताच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला. हा मृतदेह नंतर एका खड्ड्यात फेकून देण्यात आला. पुद्दुचेरीच्या आरोग्य संचालकांनी याबद्दल भाष्य करताना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'आरोग्य कर्मचारी मृतदेह दफन करण्यासाठी नेत होते. मात्र अचानक मृतदेह त्यांच्या हातून निसटला. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे,' असं संचालकांनी सांगितलं. मृत पावलेली व्यक्ती मूळची चेन्नईची रहिवासी असून पत्नीच्या भेटीसाठी पुद्दुचेरीला गेला होता. पत्नी आणि मुलं लॉकडाऊनमुळे पुद्दुचेरीमध्ये अडकली होती. पत्नीच्या माहेरी पोहोचताच त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला इंदिरा गांधी सरकारी सामान्य रुग्णालय आणि पदव्युत्तर संस्थेत (आयजीजीएचपीजीआय) उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र त्याच्या अंत्यविधीसाठी कोणीही नातेवाईक पुढे आले नाहीत. त्यामुळे रुग्णालयातले कर्मचारी त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी घेऊन गेले. तेथील व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या