शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:01 IST

CoronaVirus Treatment : अ‍ॅझिथ्रोमायसिन एक प्रकारचे अँटी-बायोटिक औषध आहे. जे बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंधित करते. हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

ठळक मुद्देअ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यूचा एकाच वेळी उपयोग रुग्णांवर करण्याच्या परिणामावर बरेच संशोधन करण्यात आले.फ्रान्समध्ये मार्च महिन्यात झालेल्या अभ्यासानुसार, असे दिसून आले आहे की या दोन औषधांचा एकाच वेळी वापर व्हायरल लोड कमी करण्यास उपयुक्त आहे.

नवी दिल्ली : कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अ‍ॅझिथ्रोमायसिनच्या  (Azithromycin) वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रोटोकॉल बदलू शकते. हे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (HCQ) सोबत वापरले जाते. सध्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येत आहे.

आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की,  "एचसीक्यूसोबत अ‍ॅझिथ्रोमायसिन वापरु नये. कारण यामुळे हृदयाची समस्या उद्भवू शकते. त्याऐवजी Doxycycline किंवा amoxycyclin आणि Clavulunic Acidचा वापर केला जाऊ शकतो."

कोरोनाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलशी संबंधित एका सूत्राने याबाबतची पुष्टी केली की, 10 जून रोजी जाहीर झालेल्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये अ‍ॅझिथ्रोमायसिनचे एचसीक्यूसोबत वापर करण्याचा उल्लेख केला नाही. यापूर्वी आयसीएमआरने अशी शिफारस केली होती की, कोरोनावरील उपचारांसाठी एचसीक्यूसह अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील दिले जाऊ शकते. दिल्लीतील एम्स रुग्णालयानेही या नव्या नियमाचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि क्लिनिकल रिसर्चवर असलेले नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. नवीत विग यांनी याबाबत सांगितले, "कोरोना संक्रमित सौम्य रूग्ण किंवा गंभीर रूग्ण असोत, सर्वात मोठा घटक म्हणजे ऑक्सिजनेशन आहे, कोरोना विषाणूच्या उपचारातील अँटीव्हायरल औषधे जास्त प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही. उपचार प्रक्रिया हळूहळू बदलली आहे. पूर्वी अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू देण्यात आले होते. मात्र, आता आम्ही संशोधनानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की, अ‍ॅझिथ्रोमायसिनची आवश्यकता नाही आहे."

"अ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यू याचे मेल केस-टू केसवर अवलंबून असते. मार्गदर्शक तत्त्वे फक्त मार्गदर्शन करतात. अँटी-व्हायरल फक्त प्राथमिक अवस्थेत कार्य करते. त्यानंतर Anti inflammatories ची आवश्यकता भासते, असे डॉ. नवीत विग यांनी सांगितले. याशिवाय, ते  म्हणाले की, यापूर्वी रुग्णांना अ‍ॅझिथ्रोमायसिन देखील देण्यात आले होते. कारण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना जिवाणू संसर्ग होण्याची भीती असते.

कोणत्या प्रकारचे आहे अ‍ॅझिथ्रोमायसिन? अ‍ॅझिथ्रोमायसिन एक प्रकारचे अँटी-बायोटिक औषध आहे. जे बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंधित करते. हे अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. न्यूमोनिया, ब्राँकायटिस, कान, घसा, फुफ्फुसाचा संसर्ग आणि लैंगिक संबंधातून पसरणारे आजार यासाठी अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर केला जातो.

कोरोनाच्या उपचारांवर अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापरअ‍ॅझिथ्रोमायसिन आणि एचसीक्यूचा एकाच वेळी उपयोग रुग्णांवर करण्याच्या परिणामावर बरेच संशोधन करण्यात आले. फ्रान्समध्ये मार्च महिन्यात झालेल्या अभ्यासानुसार, असे दिसून आले आहे की या दोन औषधांचा एकाच वेळी वापर व्हायरल लोड कमी करण्यास उपयुक्त आहे.

आणखी बातम्या...

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल” 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यmedicineऔषधं