शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

Coronavirus : देशात दर 2 तासाला एकाचा मृत्यू, 24 तासांत आढळले 328 नवे रुग्ण - आरोग्यमंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 10:27 PM

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू  तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित  कोरोनाचा संसर्ग झाले 151 रुग्णे ठणठणीत बरे

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 328 नवे कोरोनाग्रस्त आढून आले आहेत. तर दर दोन तासाला एकाचा मृत्यू होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रालयचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. 

आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयची संयुक्त पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी अग्रवाल म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशात 50 जणांचा मृत्यू झाला. तर 1965 रुग्ण पाझिटिव्ह आढळले आहेत. यातील 151 बरे झाले आहेत.

1 दिवसात मरणारांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक -

अग्रवाल म्हणाले, गेल्या 24 तासांत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 50 वैद्यकीय कर्मचारी आहेत. यात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

तलबीगी जमातशी संबंधित 400 जण कोरोना संक्रमित -

कोरोनासंदर्भातील लढाई सुरूच आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. सर्व धर्माच्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करायला हवे.  राज्य सरकारांनीही लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करायला हवी. मुंबईतील धारावीमध्ये एकाचा कोरोनाने मृत्यू झ्याल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच देशभरात तबलिगी जमातशी संबंधित 400 लोक कोरोना संक्रमित आहेत. तर 1804 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या सूचना दिल्या. यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ऑनलाईन ट्रेनिंगपासून ते रिटायर्ड डॉक्टरांची मदत मागण्यासंदर्भात अनेक मुद्द होते. तसेच कोरोनासंदर्भात रुग्णालयांसंदर्भातही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, असे लव अग्रवाल म्हणाले.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा - 

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्याम पंतप्रधान मोदींनी देशातील लॉकडाऊनच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. राज्यांनी जनतेकडून लॉकडाऊनचे कठोरपणे पालन करून घ्या, अशी सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच लोकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई भासणार नाही, याचीही काळजी राज्यांनी घ्यावी. तसेच ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील, अशा व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवावे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटईन करावे. क्वारंटाईन वॉर्ड वाढवावे लागले तर वाढवावेत, अशा सूचना यावेळी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी