शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

...जिन के सर हो इश्कही छाँव, पाँव के निचे जन्नत होगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 05:27 IST

कहानीमे गाने होते है, और उन नज्मोंके पीछे कहानीया होती! मै चाहू, तो भी ना बता पाऊ की क्या बितती है, जब मै फिल्मोंके लिए गाने लिखता हूं...

- अपर्णा वेलणकर डिग्गी पॅलेस, जयपूर : कहानीमे गाने होते है, और उन नज्मोंके पीछे कहानीया होती! मै चाहू, तो भी ना बता पाऊ की क्या बितती है, जब मै फिल्मोंके लिए गाने लिखता हूं... लेकिन इतना जरूर है, की मै चाहता हूं, मेरे गाने के छिलके निकाले जा सके!उपरका छिलका निकाले, तो अंदर कुछ और मिले...’निर्मितीचे मर्म उलगडण्याचा प्रयत्न गुलजार करत होते. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलला उसळलेली प्रचंड गर्दी ते मखमली अस्तराचे प्रांजळ मनोगत ऐकत होती!चाल आधी येते की शब्द? सांगीतल्याबरहकूम गाणे लिहिणे ही कवीसाठी शिक्षा नसते का? तुम्हाला संगीतकारांसाठी पुन्हा पुन्हा लिहावे-बदलावे लागते का?- असे प्रश्न चर्चेचे सूत्रसंचालक संजोय गुप्ता यांनी विचारले तेव्हा गुलजार हसून म्हणाले, ‘मी गेली दोनशे वर्षे हेच तर सांगतो आहे, की सिनेमासाठी लिहिताना चाल आधी येते आणि मग शब्द. सिनेमात जिथे गाणे असणार त्या प्रसंगाची पार्श्वभूमी, जे पात्र ते गाणार त्याचे व्यक्तिमत्वव भाषा हे लक्षात घ्यावे लागतेच. शब्दांना स्वर मिळतात, त्या गणितानुसार पुन्हा पुन्हा लिहावे लागतेच. त्यात काय बिघडले? ...आपने जो लिख दिया, जरा मुडके देखे तो की क्या लिखा है!! तुम्हालाच एखादा शब्द बदलावा वाटेल, एखादी ओळ पुन्हा रचावीशी वाटेल!!’’रहमान, विशाल भारद्वाज अशा प्रतिभाशाली संगीतकारांबरोबर काम करण्याचे अनुभव गुलजार यांनी सांगितले. दहा शिव्याशिवाय म्हणणे मांडूच शकणार नाही, अशा मुलीच्या व्यक्तिरेखेसाठी गाणे लिहायचा प्रसंग आला, तेव्हा ‘जा पडोसीके चुल्हेसे आग लै ले’- चा तिरका, थेट ठसका आपसूक आला असे गुलजार म्हणाले, तेव्हा ‘बिडी जलाईले’च्या तिखट चटक्याने सारेच घायाळ झाले होते.तुमचे उर्दूवर अधिक प्रेम आहे, असे म्हणताच गुलजार यांनी दोन भाषांचे मीलन किती स्वाभाविक असते याची उदाहरणे दिली. ते गंमतीत म्हणाले की उजवीकडून डावीकडे लिहिले की हिंदी असते व डावीकडून उजवीकडे लिहिले तर उर्दू!सध्याच्या गाण्यांमध्ये शिव्या व गलिच्छ शब्दांचा वापर असतो, त्याचा तुम्हाला त्रास होत नाही का? तेव्हा गुलजार म्हणाले, तरुण पिढी भाषेशी खेळणार, हे स्वाभाविकच. त्यांच्या भाषेची मला काळजी आहेच, पण भाषेच्या संपन्नतेचा वारसा ज्येष्ठ पिढीकडून येतो. हल्ली ज्येष्ठ लोक चारचौघात वापरतात त्या भाषेतली उद्धट हिंसा मला चिंतित करते. आप दोस्तीकी बात कर रहे हो या दुश्मनीकी, जब बात करे तो शब्दोंका प्रयोग जरा संभालके करे. इतनाही मै चाहूंगा!उषा उथुप यांच्या सळसळत्या गायनाने महोत्सवाचा दुसरा दिवस सुरू झाला. दिवसभर चर्चा व परिसंवादांची रेलचेल होती.>‘आंधी’ : तेव्हा आणि आत्ता!इतक्या वर्षांपूर्वी तुम्ही तत्कालीन राजकीय वातावरणावर ‘आंधी’ हा चित्रपट केला होता, आजचे वातावरण तर त्याहून अधिक बिघडलेले आहे. ‘आंधी’ चा दुसरा भाग बनवावा असे तुम्हाला आत्ता वाटते आहे का?- असा थेट प्रश्न प्रेक्षकांंमधल्या गृहस्थांनी केला. त्यावर गुलजार म्हणाले, ती माझ्या काळाची कहाणी होती. आजच्या काळाची कहाणी वेगळी आहे, ती आजच्या तरुण लेखक-दिग्दर्शकांनी पडद्यावर आणावी. कहानी आज की है, तो आज जिनका है, उन्हें ये सवाल पुंछिंये!

टॅग्स :gulzarगुलजार