शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

त्यानं मोटारबाइकवरून फेकली वरमाळा आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:38 IST

मुलीच्या घरच्यांनी दिला चोप : पोलिसांनी सुनावले; दोघेही सज्ञान असल्याने तुम्ही काहीही करू शकत नाही

नायिकेच्या वडिलांनी तिचा विवाह तिला न आवडलेल्या व्यक्तीशी वा चक्क खलनायकाशीच ठरवलेलं असतं. लग्नाचे विधी सुरू होतात. ती तणावाखाली असते. अचानक नायक तिथे पोहोचतो. तिला पाहून तिच्या जीवात जीव येतो. नायक मग सर्वांच्या समोर तिला घेऊ न जातो आणि मंडपातील सारेच स्तंभित होतात. हे आपण सर्वांनी अनेकदा चित्रपटांत पाहिलं आहे.पण प्रत्यक्षात असं क्वचितच घडतं. असाच एक प्रकार घडला. एक तरुण व तरुणीचं कॉलेजात असतानाचं प्रेम होतं. पण दोघांची जात वेगळी. घरच्यांचा त्यामुळेच विरोध होता. त्यामुळे त्यांनी भलत्याच मुलाशी तिचा विवाह निश्चित केला. लग्नाच्या मंडपात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात माळ घालणार, इतक्यात तो प्रियकर मोटारबाइकवरून तिथं पोहोचला. त्यांनी बाइकवर बसूनच आपल्या हातातील हार तिच्या दिशेनं फेकला. तो बरोबरच तिच्या गळ्यातच जाऊ न पडला. लगेच तीही त्याच्या दिशेनं धावत गेली आणि तिनंही त्याच्या गळ्यात हार घातला.मग काय, झाला की विवाह दोघांचा. अर्थात मुलीच्या घरच्यांनी त्याला चोपून काढलं. हिंदी चित्रपटांप्रमाणेच त्यावेळी ती त्याच्या अंगावर पडली आणि तिनं त्याला वाचवलं. तोपर्यंत पोलीसही पोहोचले. त्यांनी त्याची मारहाणीतून सुटका केली. दोघंही सज्ञान असल्याने तुम्ही काही करू शकत नाही, असं पालकांना सुनावलं. त्यामुळे तिचे पालकही गप्प झाले. मुलाकडचे लोक मात्र तणतणत तिथून निघून गेले. हा किस्सा उत्तर प्रदेशातल्या बिजनोरमधला.त्या दोघींनीही केला विवाहदुसरा किस्साही उत्तर प्रदेशातलाच. पण शहर आग्रा. तिथं दोन मुलींचं एकमेकांवर प्रेम होतं. आता दोन मुलींचा एकमेकींशी विवाह करून द्यायला आपले पालक तयार होणार नाहीत, याची त्यांनाही माहिती होती. त्यामुळे त्यांच्यापैकी एकीनं विवाह संस्थेत मुलगा म्हणून, तर दुसरीनं मुलगी म्हणून नोंदणी केली. दोघींनी एकमेकांना पती व पत्नी म्हणून पसंत केलं आणि सामुदायिक विवाह सोहळ्यात चक्क लग्नही केलं. त्यासाठी दोघींनी पालकही भाड्यानं आणले होते. विवाह झाल्यानंतरही दोघींच्या पालकांनी त्यांचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, दमदाटी केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पोलिसांना बोलावलं. त्यांनीही समजावलं. त्याचंही या मुलींनी ऐकलं नाही. दोघींंनी एकत्र राहण्याचा आमचा निर्णय कायम आहे, असं ठामपणे सांगितलं.त्यामुळे पोलीसही परत गेले.

टॅग्स :marriageलग्न