शिक्षा सुनावताच "त्याने" न्यायाधीशांवर फेकली चप्पल
By Admin | Updated: March 31, 2017 20:03 IST2017-03-31T20:03:34+5:302017-03-31T20:03:34+5:30
आरोपींच्या पिंज-यात उभ्या असलेल्या अरुमुगनला शिक्षा सुनावताच संताप अनावर झाला. 2014 साली त्याच्या विरोधात खटला दाखल झाला होता.

शिक्षा सुनावताच "त्याने" न्यायाधीशांवर फेकली चप्पल
ऑनलाइन लोकमत
वायानाड, दि. 31 - बलात्काराच्या प्रकरणात न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच संतापलेल्या आरोपीने पायातील चप्पल काढून न्यायाधीशींच्या दिशेने फेकल्याची धक्कादायक घटना केरळच्या वायानाड येथील कोर्टरुममध्ये घडली. आरोपीच्या या कृत्याने कोर्टरुममध्ये एकच गोंधळ उडाला.
56 वर्षीय अरुमुगनला न्यायाधीशांनी अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले. न्यायाधीशांनी अरुमुगनला 25 वर्ष सश्रम कारावास आणि 2 लाख दंडाची शिक्षा सुनावताच संपातलेल्या आरोपीने पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकली. कोर्टरुममध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपींच्या पिंज-यात उभ्या असलेल्या अरुमुगनला शिक्षा सुनावताच संताप अनावर झाला. 2014 साली त्याच्या विरोधात खटला दाखल झाला होता. या कृत्यासाठी अरुमुगनवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.