पत्नीची हत्या करुन तो राहत होता मृतदेहासोबत

By Admin | Updated: February 15, 2017 11:05 IST2017-02-15T11:05:04+5:302017-02-15T11:05:04+5:30

विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर त्याने पत्नीचे डोके धडापासून वेगळे केले

He lived with his wife and lived with dead bodies | पत्नीची हत्या करुन तो राहत होता मृतदेहासोबत

पत्नीची हत्या करुन तो राहत होता मृतदेहासोबत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर त्याने पत्नीचे डोके धडापासून वेगळे केले आणि तिच्या छिन्हविछिन्ह मृतदेहासोबत तो तब्बल दोन दिवस राहिला. अंगावर काटा आणणारी ही घटना पूर्व दिल्लीतील चंदर विहार परिसरात घडली आहे. 
 
सुबोध कुमार असे आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी स्थानिकांनी राहत्या ठिकाणी उग्र घाणेरडा वास येत असल्याची तक्रार पोलिसात केल्यानंतर सुबोधची ही विकृती उजेडात आली.  दरम्यान, पत्नीची संशयातून हत्या करणा-या सुबोधने स्वतः मात्र मूळगावी रांची येथे एका महिलेसोबत दुसरे लग्न केल्याची माहिती चौकशीद्वारे पोलिसांना मिळाली.  कारपेंटर असलेल्या सुबोधने केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. 
 
सुबोध अंमली पदार्थ आणि दारूचे सेवन करायचा. या कारणासहीत अनेक मुद्यांवर खटके त्याचे आणि त्याच्या पत्नीचे नेहमी खटके उडायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारीदेखील कुठल्याशा कारणावरुन दोघांमध्ये वादावादी झाली, याचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी संतापाच्या भरात सुबोधने पत्नीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याने त्याने तिचे डोके धडापासून वेगळे केले. 
 
तिचे कापलेले डोके त्याने एका बॉक्समध्ये व शरीर एका खोलीत ठेवले. या कुकृत्याची माहिती त्याने एका मित्रादेखील दिली. मात्र, स्थानिकांनी केलेल्या तक्रारीमुळे त्याने केलेला गुन्हा फार काळ लपून राहू शकला नाही. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत विकृत सुबोधच्या मुसक्या आवळल्या.  पत्नीच्या हत्या केल्याप्रकरणी सुबोधविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. 

Web Title: He lived with his wife and lived with dead bodies