लग्नात सात जन्माची प्रतिज्ञा घेण्यासोबतच, पती-पत्नी एकमेकांना सात वचने देतात. या वचनांपैकी एक म्हणजे पत्नीचे रक्षण करणे. मध्य प्रदेशातील सतना येथे एका पतीने हे वचन पूर्ण करताना आपला जीव गमावला. ही घटना मध्य प्रदेशातील सतना येथे घडली आहे. या ठिकाणी एक महिला तलावात आंघोळ करताना बुडू लागली. तिच्या पतीने हे पाहिले, तेव्हा त्यानेही तलावात उडी मारली. जीवाची पराकाष्टा करून पतीने पत्नीला वाचवले. पण, तिला वाचवताना त्याला मृत्यूने गाठले.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. हे प्रकरण सतना जिल्ह्यातील उंचेहरा येथील आहे. परसमनिया येथील रहिवासी राज बहादूर सिंग गोंड हे त्यांच्या कुटुंबासह घराजवळील तलावात आंघोळीसाठी गेले होते. या कुटुंबात नुकतेच एका मुलाला निधन झाले होते. त्याच्याच कार्यविधीसाठी संपूर्ण कुटुंब तलावात आंघोळ करत होते. पण, कदाचित नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
पत्नीचा जीव वाचवलाआंघोळ करत असताना राज बहादूरची पत्नी अंजू अचानक घसरली आणि खोल पाण्यात पडली. अंजूला बुडताना पाहून राज बहादूरने क्षणाचाही विलंब केला नाही. जीवाची पर्वा न करता त्यानेही तलावात उडी मारली. सर्व शक्ती आणि धाडसाने त्याने पत्नीला सुखरूप बाहेर काढले. पण, या दरम्यान तो स्वतः खोल पाण्यात अडकला आणि बुडाला. गावकऱ्यांना काहीही समजेपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. कुटुंबीयांनी त्याला उचेहरा सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राज बहादूरच्या मृत्यूची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. पारसमनिया चौकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला आहे.
पत्नी अंजूला बसला धक्का
पतीच्या मृत्युमुळे पत्नी अंजूला धक्का बसला आहे. तिने आधीच एक मूल गमावले होते. आता तिचा जोडीदारही तिला सोडून गेला आहे. राजच्या मृत्युमुळे गावकरीही दुःखी आहेत. राज अतिशय चांगला माणूस होता, त्याच्यासोबत असं काही होईल यांची कुणी कल्पनाही केली नसेल, असे गावकरी म्हणत आहेत.