शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
2
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
3
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
4
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
5
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
6
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
7
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
8
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
9
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
10
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
11
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
12
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
13
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
14
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
15
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
16
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
17
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
18
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
19
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
20
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:43 IST

"...हे राहुल गांधी यांना लवकर समजेल अशी मी आशा करते."

नवी दिल्ली : देशात संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, चर्चा सुरू आहे ती राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याची. त्यांच्या परदेश दौऱ्यांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावेळी दिल्ली स्टेट हज कमिटीच्या अध्यक्षा कौसर जहां यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करत थेट निशाणा साधला आहे.

कौसर जहां यांनी राहुल गांधी यांना 'पार्ट-टाइम पॉलिटिशियन' म्हणून संबोधले आहे. त्या म्हणाल्या, "ते विरोधी पक्षनेते आहेत, पण त्यांचा जनतेच्या प्रश्नांशी काहीही संबंध नाही. ते आधी प्रश्न विचारतात आणि सरकार उत्तर देते, तेव्हा सभागृह सोडून पळून जातात. ते सध्या SIR च्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. काल अमित शाह घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी संसदेतून कशा पद्धतीने पळ काढला, हे आपण बघितले. आता घुसखोरांशी यांचे असे काय नाते आहे, हे मला समजत नाही." एवढेच नाही तर, "यांच्या याच भूमिकेमुळे जनतेनेही यांना गांभीर्याने घेणे सोडले आहे. याच कारणामुळे ते एकापाठोपाठ एक निवडणुका हरत आहेत आणि पराभवानंतर वारंवार ईव्हीएमचे कारण सांगतात," असेही त्या म्हणाल्या.

पीएम मोदींच्या कामावर जनतेचा विश्वासकौसर जहां पुढे म्हणाल्या, "हे लोक वारंवार एसआयआरचे कारण सांगतात. पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याणकारी कामांमुळे जनता भाजपवर विश्वास दाखवत आहे. दुर्दैवाने राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला याचा अनुमानच नाही. असे त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांनी, अमित शाह बोलत असताना राहुल गांधी यांनी त्यांचे बोलणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्याचाही त्यांनी उल्लेख केला.

राहुल गांधी यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद -राहुल गांधी यांना गोपनीय परदेश दौऱ्या करण्याचा मोठा छंद आहे आणि मलावाटचे की, यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते स्वतःच त्रस्त असावेत, असेही त्या म्हणाल्या. भारताच्या राजकारणात आता पार्टटाईम पॉलिटिशियन चालणार नाही. येथे कर्मयोगी मोदी आहेत. त्यांनी गेल्या १२ वर्षांत एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली आहे आणि लोक आपल्या कर्मयोग्याला मनापासून पसंत करतात. मोदी जींनी जनतेचे मन जिंकले आहेत. हे राहुल गांधी यांना लवकर समजेल अशी मी आशा करते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi slammed for foreign trips, termed 'part-time' politician.

Web Summary : Delhi State Haj Committee President Kausar Jahan criticized Rahul Gandhi as a 'part-time politician' with a penchant for secret foreign trips. She highlighted his disconnect from public issues and questioned his absence during crucial parliamentary debates, contrasting him with PM Modi's dedication.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा