शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

Veer Savarkar: “सावरकर खरे देशभक्त, शंका घेणाऱ्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे”; अमित शहांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 11:56 IST

Veer Savarkar: अमित शहा अंदमान दौऱ्यावर असून, राष्ट्रीय स्मारक सेल्युलर कारागृहास भेट देऊन हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केले.

ठळक मुद्देब्रिटिशांनी बांधलेले हे सेल्युलर जेल देशातील लोकांसाठी सर्वांत मोठे तीर्थक्षेत्रमाझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा भावनिक क्षणस्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि त्यांचा त्याग, शौर्य याबद्दल शंका घेता येणार नाही

पोर्ट ब्लेयर: गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबद्दल विविध स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यापासून ते प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यापर्यंत अनेकांनी सावरकर आणि त्यांच्याबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत भाष्य केले आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून, सावरकर खरे देशभक्त होते. त्यांच्या त्याग आणि शौर्याबाबत शंका उपस्थित करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असा पलटवार केला आहे. 

अमित शाह तीन दिवसांच्या अंदमान-निकोबर दौऱ्यावर असून, राष्ट्रीय स्मारक सेल्युलर कारागृहास भेट देऊन हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बंदीवास भोगलेल्या कोठडीस भेट देऊन सावरकरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 

सावरकरांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती आणि त्यांचा त्याग, शौर्य याबद्दल शंका घेता येणार नाही आणि जे त्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्याची थोडी तरी लाज वाटली पाहिजे. सावरकरांना वीर ही उपाधी कोणत्याही सरकारने दिलेली नाही, तर देशातील १३० कोटी लोकांनी त्यांना ती त्यांच्या देशप्रेम, शौर्याबद्दल बहाल केली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

थोडी तरी लाज बाळगा

ज्यांनी देशासाठी कारावास भोगताना कोलूवर पशुवत यातना भोगत अपार घाम गाळला, ज्यांना दोन जन्मठेपा सुनावण्यात आल्या, त्यांची निष्ठा, त्यागाबद्दल तुम्ही शंका कशी घेऊ शकता, थोडी तरी लाज बाळगा, असा हल्ला अमित शाह यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल शंका उपस्थित करणाऱ्यांवर चढविला.

दरम्यान, ब्रिटिशांनी बांधलेले हे सेल्युलर जेल देशातील लोकांसाठी सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र आहे. म्हणूनच सावरकर म्हणायचे की तीर्थक्षेत्रांमध्ये हे एक महान तीर्थ आहे, जिथे अनेक लोकांनी स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी बलिदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीत जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हा माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हा भावनिक क्षण होता. येथे येऊन देशभक्तीची भावना आणखी प्रचंड आणि तीव्र होते, असे अमित शाह यांनी म्हटले. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरAmit Shahअमित शाहandaman-and-nicobar-islands-pcअंडमान आणि नोकोबार द्वीप समूहBJPभाजपा