पन्नास रुपये न दिल्याने डोक्यात दगड मारला
By Admin | Updated: February 7, 2016 22:45 IST2016-02-07T22:45:44+5:302016-02-07T22:45:44+5:30
फोटो

पन्नास रुपये न दिल्याने डोक्यात दगड मारला
फ टो जळगाव: पन्नास रुपये न दिल्याने बलदार नासीर पिंजारी (वय ५१ रा.हरीविठ्ठल नगर) यांच्या संतोष भगवान कोळी याने डोक्यात दगड टाकून जखमी केले त् केल्याची घटना रविवारी सकाळी हरीविठ्ठल नगरातील भोई गल्लीत घडली.या हाणामारीत संतोष कोळी यांनाही किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान, परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या पाच जणांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पिंजारी यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी घराबाहेर उभा असताना संतोष कोळी हा दारु पिऊन आला व पन्नास रुपये मागायला लागला. त्याला पैसै देण्यास नकार दिल्याने जातीवाचक बोलून शिवीगाळ करायला लागला. दोघांमध्ये होणार्या शाब्दीक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. कोळी याने रस्त्यावर पडलेला दगड उचलून डोक्यात मारला. यात पिंजारी यांना जखम झाली. प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने पिंजारी यांनी तशाच स्थितीत रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले.या हाणामारीत कोळी यालाही किरकोळ लागले आहे.त्यानेही पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुपारी परस्पर विरोधी तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ाची नोंद करण्यात आली आहे.वृध्दास मारहाणघराबाहेर उभा असताना माझ्याकडे डोळे वटारुन का पाहतो असे म्हणत धुडकू दगा बारी (वय ५८, रा.हरीविठ्ठल नगर) यांना रफीक, मुशीर व त्याच्या बहिणीने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी हरीविठ्ठल नगरात घडली. रफीक व मुशीर यांनी तू आमच्या बहिणीकडे का पाहतो असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली.