शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शीला दीक्षित यांना पदावरून दूर करण्यासाठी जोरदार मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:19 IST

दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापत आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकारण तापत आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांना पदावरून दूर करण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन, अरविंदर सिंह लवली व नसीब सिंह सक्रिय झाले आहेत. शीला दीक्षित यांनी आपल्या अनुपस्थितीत ही जबाबदारी त्यांचे पुत्र व माजी खासदार संदीप दीक्षित यांच्याकडे सोपवू नये, यासाठी तिघांचे जोरदार प्रयत्न सुरूआहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी शीला दीक्षित यांच्याकडे दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हापासूनच हे नेते त्यांच्याविरोधात सक्रिय होते. आम आदमी पार्टीशी निवडणुकीत आघाडी करण्याचा मुद्दा चर्चेत आला तेव्हाच शीला दीक्षित यांच्याबाबत पहिला हंगामा झाला. राहुल गांधी यांची इच्छा असूनही शीला दीक्षित यांच्या भूमिकेमुळे ही आघाडी होऊ शकली नाही.उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाको यांनी या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेतली. पक्ष चालविण्याची जबाबदारी त्यांनी कार्यकारी अध्यक्षांकडे सोपवली, तसेच शीला दीक्षित यांना पत्र लिहून सूचितही केले की, त्या फोनवर संवाद साधत नाहीत व पत्रांना उत्तरेही देत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत पक्ष चालविण्याची जबाबदारी कार्यकारी अध्यक्षांकडे सोपविण्यात आली आहे. शीला दीक्षित यांना प्रदेशाध्यक्ष करतेवेळी राहुल गांधी यांनी कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती केली होती, हे विशेष.उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित या त्यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, ही बाब प्रदेशातील नेत्यांना मान्य नसल्यामुळे संघर्ष वाढला आहे. याच दरम्यान, माकन, अरविंदर व नसीब यांनी पक्षातील इतर नेत्यांना विश्वासात घेऊन मोहीम सुरू केलीआहे.आतापर्यंत पक्षाच्या २९ ज्येष्ठ नेत्यांना त्यांनी विश्वासात घेतल्याचे बोलले जात आहे. यात माजी अध्यक्ष जे.पी. अग्रवाल यांचाही समावेश आहे. या मोहिमेत तिन्ही कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोटिया, हरुण युसूफ व देवेंद्र यादव हेही सहभागी आहेत. या सर्वांची एकच मागणी आहे की, शीला दीक्षित यांना पदावरून दूर करून तात्काळ नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी सोपवावी जेणेकरून निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन पूर्णपणे सक्षम बनेल.>पक्ष प्रभारींकडे केली तक्रारसध्या शीला दीक्षित या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाचे कामकाज पाहू शकत नसल्याने त्यांना पदावरून दूर करण्यासाठी दिल्लीचे काँग्रेस नेते सज्ज झाले आहेत. अनेक नेत्यांनी काँग्रेसचे प्रभारी पी.सी. चाको यांना पत्र लिहून तक्रारही केली आहे. वेळीच यात हस्तक्षेप केला नाही, तर लोकसभा निवडणुकीप्रमाणेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाची गत होईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस