शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

'गोमातेचा चारा खाल्ला, लोककल्याण काय करणार', अमित शाह यांची लालू प्रसाद यादवांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:24 IST

Amit Shah criticizes Lalu Prasad Yadav: लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले.

- एस. पी. सिन्हा  गोपालगंज (बिहार) - लालूप्रसाद यादव यांनी गोमातेचा चाराही खाल्ला. ते बिहारच्या लोककल्याणाचा विचार करू शकत नाहीत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला पुन्हा निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. बिहारला लालू-राबडीच्या जंगलराजकडे जायचे आहे की मोदी-नितीशकुमार यांच्या विकासाच्या रस्त्यावर जायचे आहे, याचा निर्णय घ्यायचा आहे, असेही गोपालगंज येथील जाहीर सभेत ते म्हणाले. जे काम काँग्रेस ६५ वर्षात करू शकली नाही ते काम मोदी सरकारने १० वर्षात केले. लालू प्रसाद यादव यांनी तर गोमातेचा चाराही खाल्ला, अशी टीका त्यांनी केली.

अमित शाह म्हणाले की, राजद आणि काँग्रेसने बिहारचे नुकसान केले. लालूंनी मुलगी, पत्नी, भाऊ, मेहुण्याला राजकारणात स्थिर केले. परंतु बिहारच्या युवकांसाठी काहीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या युवकांना रोजगार दिला. आता पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास पाच वर्षात बिहारला पूर-मुक्त करण्यात येईल. त्यामुळे बिहारच्या जनतेने मोदी-नितीशकुमार यांचे सरकार आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

बिहारने देशाला नेहमीच मार्ग दाखवला• देशाचे स्वातंत्र्याचे आंदोलन असो की जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन असो, नेहमी या भूमीने देशाला रस्ता दाखवण्याचे काम केले आहे. आपण अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले. परंतु, लालू आणि त्यांच्या साथीदारांनी त्यात आडकाठी आणली.● पंतप्रधानांनी ५५० वर्षांनी २ रामलल्लाला भव्य मंदिरात विराजमान केले. बिहारमध्ये माता सीतेचे भव्य मंदिर होईल, असे शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार