सागर पार्कवर हॉकर्सला बंदी निर्णय : नागरिकांच्या तक्रारीनंतर उपमहापौरांचे आदेश
By Admin | Updated: November 10, 2015 20:21 IST2015-11-10T20:21:44+5:302015-11-10T20:21:44+5:30
जळगाव : सागर पार्कवर महिलांची छेडखानी होण्याचे तसेच तेथे जमणार्या टोळक्यांमध्ये हाणामार्या होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्याने या हॉकर्सना तेथून हटविण्याचे आदेश उपमहापौर सुनील महाजन यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहे. सोमवारपासून ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अतिक्रमण विभागाने बुधवारपासूनच कारवाईचा इशारा दिला आहे.

सागर पार्कवर हॉकर्सला बंदी निर्णय : नागरिकांच्या तक्रारीनंतर उपमहापौरांचे आदेश
ज गाव : सागर पार्कवर महिलांची छेडखानी होण्याचे तसेच तेथे जमणार्या टोळक्यांमध्ये हाणामार्या होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्याने या हॉकर्सना तेथून हटविण्याचे आदेश उपमहापौर सुनील महाजन यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहे. सोमवारपासून ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अतिक्रमण विभागाने बुधवारपासूनच कारवाईचा इशारा दिला आहे. सागर पार्कवर रविवारी रात्री नऊ वाजता क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटाचे सात ते आठ तरुण एकमेकाच्या अंगावर धावून आले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वीही या ठिकाणी दोन गटात हाणामारी झाली होती. त्यावेळीच पोलिसांनी मनपाला या मैदानावरून हॉकर्स हटविण्याचे सूचित केले होते. मात्र लेखी पत्र देण्याचे टाळले होते. दरम्यान या ठिकाणी टारगट मुलांची गर्दी वाढत असल्याने महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्याबाबत तक्रारी वाढल्याने अखेर उपमहापौरांनी मंगळवारी अतिक्रमण विभागाला कारवाईचे आदेश दिले. या मैदानावर एकही हॉकर्स थांबणार नाही, याची जबाबदारी अतिक्रमण अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. तसेच या हॉकर्सवर कारवाई न केल्यास काही गंभीर घटना घडली तर त्याची जबाबदारी उपायुक्त व अतिक्रमण अधीक्षकांची राहील, असेही बजावले. त्यामुळे अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांनी या हॉकर्सला कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे हे हॉकर्स त्यांच्या असोसिएशनच्या पदाधिकार्यांसह मनपात आले. त्यांनी उपमहापौरांची भेट घेऊन कारवाई न करण्याची मागणी केली. मात्र नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने दिवाळीपर्यंत कारवाईत सूट मिळेल. त्यानंतर तेथे व्यवसाय करता येणार नाही, असे उपमहापौरांनी स्पष्ट केले. तसेच आदेश मोडून व्यवसाय केल्यास नोटरीदेखील रद्द केली जाईल, असा इशारा दिला आहे.