शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape: ‘हाथरस’चा तपास सीबीआयकडे; योगी सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 06:53 IST

Hathras Gangrape case CBI Probe: कुटुंबीयांकडून मात्र न्यायालयीन चौकशीची मागणी

हाथरस : उत्तर प्रदेश पोलिसांवर अथवा सीबीआयवर आमचा विश्वास नसून, आमच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि तिचा मृत्यू यांची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबीयांनी शनिवारी केली. त्यानंतर काही मिनिटांतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा केली.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी कधीही सीबीआय चौकशीची मागणी केली नव्हती. किंबहुना आम्हाला सीबीआय तपास नको, आमचा त्या यंत्रणेवर विश्वास नाही, असे कुटुंबातील प्रत्येक जाण सांगत होता. तरीही सरकारने तपास सीबीआयकडे सोपविला आहे.दरम्यान, शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. प्रियांका यांनी मुलीच्या आईला आलिंगन दिले, तेव्हा सर्वच जण भावुक झाले. हे दोन्ही नेते सुमारे एक तास कुटुंबियांसमवेत होते.येथील सरकारी यंत्रणेकडून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, त्रास दिला जात आहे. आमचा उत्तर प्रदेश पोलिसांवर आणि सीबीआयवर अजिबात विश्वास नाही, असे मृत पीडितेच्या आईने प्रियांका यांना सांगितले. मुलीवरील अत्याचारांची न्यायालयीन चौकशीच व्हायला हवी, असे आईने सांगितल्याची माहिती प्रियांका गांधी यांनी भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.राहुल व प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब हटविण्यात यावे, अशी या कुटुंबीयांची मागणी आहे. जिल्हाधिकारी आम्हाला धमकावत आहेत, असे कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले आहे. आम्ही कुटुंबियांचे सांत्वन करायला आलो आहोत, या प्रश्नाचे आम्हाला राजकीय भांडवल करायचे नाही, असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने या कुटुंबाचे रक्षण करावे, अशी मागणीही राहुल यांनी केली.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला हवी ती मदत आन्ही करू, असे राहुल आणि प्रियंका यांनी कुटुंबीयांना सांगितले. प्रियांका गांधी म्हणाल्या की महिलांवर होणाºया अत्याचाराविरोधात आपण कायमच उभे राहू. अत्याचाराविरोधात देशभर फिरू. इथे दलितांवर आधी काही तरुणांनी अत्याचार केला आणि आता सरकारी यंत्रणा घरच्यांना त्रास देत आहे.न्यायालयात याचिका करणार?या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे मुलीच्या भावाने सांगितले. आम्हाला सीबीआय तपास नकोच आहे, असे मृत मुलीच्या वहिनीने सांगितले. कदाचित तशी याचिका कुटुंबीय वा अन्य कोणामार्फत सर्वोच्च न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे.राहुल आणि प्रियांका गांधी यांनी घेतली कुटुंबीयांची भेटराहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाला भेट दिली. तासभर चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसतर्फे या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश दिला. त्यावर किती रक्कम लिहिली आहे, हे आपण अद्याप पाहिलेले नाही, असे मुलीच्या भावाने पत्रकारांना सांगितले.तिसऱ्या दिवशी भेटीची परवानगीया कुटुंबीयांना भेट देण्याच्या प्रयत्न राहुल आणि प्रियांका गांधी यांनी गुरुवारीच केला होता. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी याला अटकाव करीत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्कीही करण्यात आली.शुक्रवारीही तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह आलेल्या अन्य महिला खासदारांनाही हाथरसमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी ओब्रायन यांच्याशीही धक्काबुक्की केली.शनिवारीही राहुल, प्रियांका व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि हजारो कार्यकर्त्यांसह नवी दिल्लीतून हाथरसच्या दिशेने निघाले. शशी थरुर यांच्यासह ३० खासदार सोबत होते. कोणाही प्रवेश करू नये यासाठी २०० हून अधिक पोलिसांना तैैनात होते. यामुळे तिथे छावणीचे स्वरुप आले होते. अखेर पोलिसांनी दुपारी काँग्रेसच्या ताफा अडवला व कार्यकर्त्यांवर लाठीमारही केला.यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाल्याने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पाच जणांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. राहुल आणि प्रियांका गांधी यांच्योबत के. सी. वेणुगोपाल व अधिररंजन चौधरी यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारyogi adityanathयोगी आदित्यनाथCBIगुन्हा अन्वेषण विभाग