शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Hathras Gangrape : पोलिसांमध्ये धास्ती! राहुल गांधी मोटारसायकलवरून हाथरसला जाण्याची भीती

By मुकेश चव्हाण | Published: October 03, 2020 10:03 AM

गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र आज पुन्हा राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान राहुल गांधी आज दुपारी पुन्हा हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. 

फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, मी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना मला पोलिसांनी अडवलं. त्यानंतर मी आणि  प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे"

"योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत. गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती होती. तेव्हा आम्ही उन्नावच्या लेकीसाठी अशी लढाई लढत होतो" असं प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

"त्यांना इतिहास माफ करणार नाही"

"राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी देशात विरोधी पक्षाने बोलूच नये अशी भूमिका घेणे ही पूर्णपणे चुकीची आहे. देशातील प्रमुख पक्षाला जर याची जाणीव झाली नसेल तर एक दिवस जनता त्यांची कॉलर धरून खाली पाडेल" असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ