हसन मुश्रीफ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
By Admin | Updated: January 14, 2015 23:55 IST2015-01-14T23:16:22+5:302015-01-14T23:55:28+5:30
कागल : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना आज, बुधवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. उद्या, गुरुवारी सकाळी ते नागरिकांना भेटणार आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कागलमधील निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत मंडप उभारण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
कागल : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना आज, बुधवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. उद्या, गुरुवारी सकाळी ते नागरिकांना भेटणार आहेत, असे त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कागलमधील निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत मंडप उभारण्यात आला आहे.
अतिउच्च रक्तदाबामुळे त्यांना शुक्रवारी (दि. ९) तातडीने कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात ठेवावे लागल्याने कार्यकर्त्यांना भेटीसाठी सोडण्यात आले नव्हते. या दरम्यान जिल्ातील विविध नेते-पदाधिकारी त्यांना भेटून प्रकृतीची चौकशी करून गेले. मात्र, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. म्हणून उद्या ते कार्यकर्ते आणि हितचिंतकांना भेटणार आहेत. हसन मुश्रीफ यांचे सध्या ६१ वर्षे वय सुरू आहे. यापूर्वी त्यांना या पद्धतीने उपचारासाठी दाखल व्हावे लागले नव्हते. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले होते. डॉक्टरांनी त्यांना अजूनही विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे ते एक दिवस लोकांना भेटून पुन्हा विश्रांतीसाठी रवाना होणार असल्याचे समजते.
फोटो : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे कोल्हापूर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बाहेर पडताना.