शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुरुष आमदाराची बदनामी झाली नाही का?; संजय राऊतांचा व्हायरल व्हिडिओवर खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:10 IST

जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? असं राऊतांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरण महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणी विधानसभेत महिला आमदारांनी मुद्दा उचलून धरला. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या आमदारांनी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या युवा नेत्याला या प्रकरणी अटक झाली. त्यावर साईनाथ दुर्गेला झालेली अटक ही चुकीची असून कायद्याचा गैरवापर आहे. मला ते प्रकरण फारसं माहित नाही. जो व्हिडिओ आलाय तो खरा की खोटा याचा शोध घ्या असं सांगत संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, व्हि़डिओ मॉर्फिंग झालंय की नाही त्याचा तपास करा. त्यासंदर्भातील पुरुष आमदाराची तक्रार आहे का? ते कुठे आहेत. बदनामी त्यांची झालीय. जर असा व्हिडिओ असेल तर त्यांचीही बदनामी झाली असेल. पुरुषाची बदनामी होत नाही का? आणि मिंदे गटातील महिलेचा आरोप माझी बदनामी झालीय. त्याबाबत खटले दाखल होऊ शकते. ही चित्रफित व्हायरल होतेय लाखो कोट्यवधी लोकांमध्ये जाते मग तुम्ही किती जणांना अटक करणार? SIT स्थापन करून चौकशी करावी. कुठल्याही महिलेची बदनामी होऊ नये. सन्मान व्हायला हवा. मग ते कुठलेही सरकार असो. पण काही गोष्टी राजकारणासाठी, राजकीय सूडबुद्धीने होत असतील तर त्याला राजकीय कृतीने उत्तर दिले जाऊ शकते असं त्यांनी सांगितले. 

बाप पळवतात आता मुलंही पळवायला लागले सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. त्यांचे चिरंजीव नाही. याबाबत सुभाष देसाईंनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध केलेय. भूषण देसाईंचा कधीही शिवसेनेशी संबंध नव्हता. तो कधीही पक्षात सक्रीय नाही. पण हा मिंदे गट कधी बाप पळवतात आता मुलंही पळवायला लागले. पण ही मेगाभरती सुरु आहे ती कुचकामी आहे. मिंदे गटातील सामंत लोणीवाल्यांनी याच चिरंजीवाबद्दल काही आरोप केले. हेच ते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत असेही म्हटलं. पण त्यानंतरच त्याच चिरंजीवाला त्यांचे मुख्यमंत्री वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ करून बाजूला घेऊन बसलेत. कोकणातील जे मंत्री आहेत त्यांनी आरोप केले त्याचे काय झाले याचे उत्तर द्या असा संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला विचारलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना