शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:38 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का, असा सवाल केला आहे. 

ठळक मुद्देभाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का?माझे नाव सिद्धरामय्या आहे. सिद्धू आणि रामा माझ्या नावात आहे. हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का, असा सवाल केला आहे. सिद्धरामय्या यांनी कन्नडमधून ट्विट केले आहे. त्यांचे ट्विट गुगल ट्रान्सलेट केल्यावर त्यांनी काय म्हटले आहे ते समजते. फक्त भाजपाचे नेते हिंदू आहेत का? आम्ही हिंदू नाही का? भाजपाने हिंदुत्व भाडेतत्वावर घेतले आहे का? माझे नाव सिद्धरामय्या आहे. सिद्धू आणि रामा माझ्या नावात आहे. आपण सगळे हिंदू आहोत. मात्र, आपल्याला सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. आपण सर्व एकसारखे दिसतो, याचा सन्मान केला पाहिजे. हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. हाच खरा हिंदुत्व आहे, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर टीकेची झोड उठवली होती. यावर बोलताना सिद्धरामय्या यांनी अशाप्रकारे ट्विटरच्यामाध्यमातून प्रतिक्रिया दिली. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर हुबळीमध्ये आयोजित एका रॅलीमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते. त्यावेळी त्यांनी कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असून, त्यांच्या हत्याही होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे कर्नाटकमध्ये अराजकता माजली असल्याचा आरोप  सिद्धरामय्या यांच्यावर केला. तसेच, ते म्हणाले कर्नाटक ही हनुमानाची भूमी मानली जाते. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करण्यात धन्यता मानतात असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.  दरम्यान , ही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये टिपू सुलतानाची जयंती साजरी केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपा