शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 14:18 IST

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

ठळक मुद्देहरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रविवारी दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सपनाने भाजपामध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

नवी दिल्ली - हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरीनेभाजपामध्ये प्रवेश केला आहे. रविवारी (7 जुलै) दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सपनाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजपा नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते.

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान सुरू आहे. या अभियानामध्ये सहभाग घेत सपनाने आज भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. सपना चौधरी ही तेरी आंख्या को यो काजोल... मन करे से गोरी घायल.... या गाण्यामुळे देशभर पोहोचली असून तिचे खूप फॅन फॉलोवर्स आहेत.   

लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील होण्याचे वृत्त सपना चौधरीने फेटाळले होते. सपनाने पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेसमध्ये सामील झालो नसल्याचे देखील म्हटले होते. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो जुने होते, असंही सपनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर सपना भाजपामध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात होते. या संदर्भात मनोज तिवारी यांनी ती भाजपामध्ये येणार की नाही, हे येणाऱ्या काळातच समजेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता सपना चौधरीने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

टॅग्स :Sapna Choudharyसपना चौधरीBJPभाजपा